
no images were found
विश्वकर्मा जयंतीदिनी देशात सुट्टी जाहीर करण्याची मागणी करणार
चिपळूणमध्ये रत्नागिरी जिल्हा पांचाळ सुतार समाज संघाच्या 25 व्या रौप्यमहोत्सवी जिल्हा मेळाव्यात विनायक राऊत यांचे वक्तव्य
चिपळूण : चिपळूणमध्ये रत्नागिरी संघाजिल्हा पांचाळ सुतार समाज च्या 25 व्या रौप्यमहोत्सवी जिल्हा मेळाव्यास मविआचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत या मेळाव्यास उपस्थित होते. त्यांनी यावेळी विश्वकर्मा जयंतीदिनावरून वक्तव्य करताना, संसदेच्या अधिवेशनात त्यासाठी मागणी करणार असल्याचे सांगितले.
उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत पांचाळ सुतार समाजच्या 25 व्या रौप्यमहोत्सवी जिल्हा मेळाव्यास उपस्थित होते. यावेळी बोलताना राऊत यांनी विश्वकर्मा जयंतीदिनावरून आपण विश्वकर्मा जयंतीदिनी देशात सुट्टी जाहीर करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे राज्यात रामनवमी, शिवजयंतीला सुट्टी असते तर जगाच्या सृष्टीच्या निर्मात्याच्या जयंतीला सुट्टी का देत नाही असा सवाल उपस्थित केला आहे.