no images were found
शहरातील विनापरवाना 189 डिजीटल बोर्ड जप्त
कोल्हापूर,(प्रतिनिधी): महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी शहरात सोमवार सायंकाळपासून आचारसंहिता लागू झाली आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी शहरातील विनापरवाना डिजीटल बोर्डवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील अनाधिकृत व बेकायदेशरी लावण्यात आलेल्या डिजीटल बोर्डवर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. या अंतर्गत आज विभागीय कार्यालय क्र.1 ते 4 व अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत शहरातील 189 अनाधिकृत डिजीटल बोर्डवर कारवाई करुन ते जप्त करण्यात आले.
ही कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण अधिक्षक विलास साळोखे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, सहा.अधिक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत व विभागीय कार्यालयाकडील कर्मचाऱ्यां मार्फत करण्यात आली.