Home शासकीय उमेदवारांसाठी ‘एक खिडकी’ ना-हरकत दाखला केंद्राची व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

उमेदवारांसाठी ‘एक खिडकी’ ना-हरकत दाखला केंद्राची व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

54 second read
0
0
31

no images were found

उमेदवारांसाठी ‘एक खिडकी’ ना-हरकत दाखला केंद्राची व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

 

कोल्हापूर, (प्रतिनिधी): कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने उमेदवारांना ‘ना हरकत दाखला’ देण्यासाठी राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील हॉलमध्ये स्वतंत्र ‘एक खिडकी’ केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्रासह विविध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची आज प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी पाहणी केली.                                                        उमेदवारांना महापालिकेच्या विविध विभागांत वारंवार जावे लागू नये, यासाठी सर्व आवश्यक माहिती व देयके एकाच ठिकाणी पूर्ण करता यावीत, या उद्देशाने ‘एक खिडकी’ केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रावर संबंधित सर्व विभागांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, आवश्यक येणे-देणे स्वीकारून तात्काळ ‘ना हरकत दाखले’ वितरित करण्यात येणार आहेत. महापालिकेची थकीत रक्कम असल्यास ती याच ठिकाणी सीएफसीच्या माध्यमातून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्रशासकांनी दुपारी या केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला.

            याचबरोबर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेसाठी शहरातील विविध ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यानुसार,

  • कसबा बावडा पॅव्हेलियन हॉल : प्रभाग क्र. 1, 2 व 5
  • छत्रपती ताराराणी मार्केट (विभागीय कार्यालय क्र. 4) : प्रभाग क्र. 3, 4 व 15
  • दुधाळी पॅव्हेलियन : प्रभाग क्र. 6, 7 व 8
  • राजोपाध्ये नगर : प्रभाग क्र. 9 व 20
  • गांधी मैदान पॅव्हेलियन हॉल : प्रभाग क्र. 10, 11 व 19
  • छत्रपती शिवाजी मार्केट (विभागीय कार्यालय क्र. 2) : प्रभाग क्र. 12, 13 व 14
  • मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम : प्रभाग क्र. 16, 17 व 18

            या कार्यालयांत संबंधित प्रभागांतील उमेदवारांचे नामनिर्देशन स्वीकारणे, नामनिर्देशन पत्रांची छाननी, निवडणूक साहित्य वाटप तसेच मतदानानंतर मतदान यंत्रे जमा करून घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

            प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी कसबा बावडा पॅव्हेलियन हॉल, छत्रपती शिवाजी मार्केट येथील विभागीय कार्यालय, दुधाळी पॅव्हेलियन हॉल तसेच राजोपाध्ये नगर येथील कार्यालयांची पाहणी करून निवडणूक कामकाजासाठी आवश्यक सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना शहर अभियंता रमेश मस्कर यांना दिल्या.

            या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, निवडणूक निर्णय अधिकारी सुशील संसारे व संदीप भंडारे, उपआयुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे व स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उप शहर रचनाकार एन. एस. पाटील तसेच उपशहर अभियंता सुरेश पाटील उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…