Home शासकीय सवलत योजनेचा 79064 करदात्यांनी घेतला लाभ

सवलत योजनेचा 79064 करदात्यांनी घेतला लाभ

0 second read
0
0
74

no images were found

सवलत योजनेचा 79064 करदात्यांनी घेतला लाभ

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व मिळकतधारकांना पोस्ट ऑफीस मार्फत सन 2022/23 या आर्थिक वर्षासाठीची सुमार 155000 इतक्या मिळकतीची देयके लागु करणेत आली आहेत. सन 2022/23 या आर्थिक वर्षामधील घरफाळा देयकाचे चालु मागणीवर 2 टक्के सवलतीचे शेवटचे 10 दिवस शिल्लक असून दि. 1 डिसेंबर 2022 पासुन सन 2022/23 आर्थिक वर्षामधील घरफाळा देयकाचे चालु मागणीवर सुध्दा दंडाची आकारणी सुरु होणार आहे.

घरफाळा विभागाकडून शहरातील मिळकत कर चालू मागणी एक रक्कमी भरणा करणाऱ्या 79064 मिळकतधारकांनी आज  अखेर दि. 1 एप्रिल ते 21 नोंव्हेबर. 2022 अखेर रु. 43 कोटी 39 लाख 36 हजार पाचशे सत्याण्णव फक्त इतका मालमत्ता कर भरणा केला आहे.  यामधील सुमारे 20614 करदात्यांनी गुगल पे, फोन पे व इतर युपीआय वॉलेट सुविधेचा लाभ घेतला आहे. चालु मागणीवरील 2 टक्के सवलत योजनेचे शेवटचे 10 दिवस शिल्लक आहेत यांचा लाभ जास्तीत जास्त मिळकतधारकांनी घ्यावा.

तरी शहरातील सर्व मिळकतधारकांनी आपल्या कराचा भरणा करुन महापालिकेस सहकार्य करावे व जास्तीत जास्त करदात्यांनी सवलत योजनेचा लाभ घ्यावा व दंडासारखा कटु प्रसंग टाळावा असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…