Home क्राईम फॉरेन्सिक तपासणीत आफताबच्या बाथरूममध्ये मिळाले श्रद्धाचे रक्त

फॉरेन्सिक तपासणीत आफताबच्या बाथरूममध्ये मिळाले श्रद्धाचे रक्त

0 second read
0
0
107

no images were found

फॉरेन्सिक तपासणीत आफताबच्या बाथरूममध्ये मिळाले श्रद्धाचे रक्त

नवी दिल्ली : फॉरेन्सिक तपासणीत आफताबच्या बाथरूममध्ये रक्त सापडल्याची पुष्टी झाली आहे. श्रद्धा हत्याकांड प्रकरणातील हा महत्त्वाचा पुरावा मानल्या जात आहे. आफताबच्या बाथरुमच्या टाइल्सवर रक्ताचे डाग आढळून आले आहेत. यापूर्वी फॉरेन्सिक टीमला स्वयंपाकघरात काही रक्ताचे डाग आढळले होते. फॉरेन्सिक तपासाशिवाय पोलिसांनी अधिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या सीएफएसएलकडून पुरावेही गोळा केले. सीएफएसएलचा अहवाल येण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागतो.
आफताबच्या नार्को चाचणीपूर्वी पॉलीग्राफ चाचणी करायची आहे. यासाठी साकेत न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली. दिल्ली पोलिसांनी यासाठी तयारी पूर्ण केली आहे. गरजेनुसार आफताबची पॉलीग्राफ चाचणी केव्हाही करता येते. डॉक्टर आणि तज्ज्ञांची टीमही पूर्णपणे तयार आहे. आफताबची पॉलीग्राफ चाचणी केल्यानंतर नार्को चाचणी केली जाईल. आफताबने दोन्ही चाचण्यांसाठी संमती दिली आहे.यापूर्वी कोर्टाने आफताबला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कोर्टात न्यायाधीशांसमोर आफताबने श्रद्धाची हत्या केल्याचे सांगितले. आता तो पोलीस तपासात सहकार्य करत असल्याची माहिती आहे.
याआधी आफताबने त्या जागा पोलिसांनाही सांगितल्या होत्या. जिथे त्याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर शस्त्रे फेकली. आफताबच्या म्हणण्यानुसार, श्रद्धाच्या हत्येमध्ये वापरलेले करवत आणि ब्लेड गुरुग्रामच्या डीएलएफ फेज 3 च्या झुडपात फेकण्यात आले होते. तर मेहरौलीच्या रोडवर असलेल्या डस्टबिनमध्ये त्याने सॅंडपेपर फेकून दिले होते. दिल्ली पोलिसांच्या पथकाने गुरुग्राममध्ये दोनदा त्या झुडपांची तपासणी केली आहे. १८ नोव्हेंबर रोजी येथे तपास केल्यानंतर, दिल्ली पोलिसांच्या पथकाने गुरुग्रामच्या झुडपातून काही पुरावे बाहेर काढले, जे सीएफएसएल तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. यानंतर १९ नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलीस मेटल डिटेक्टर घेऊन तपासासाठी गुरुग्रामला गेले, मात्र त्या दिवशी पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. श्रद्धा हत्याकांडाचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांना महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …