no images were found
…तरीही कतारमध्ये फडकणार कोल्हापूरचा झेंडा
कोल्हापूर : फिफा विश्वचषक २०२२ ला शानदार सुरुवात झाली आहे. यंदाच्या फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद कतारकडे आहे, या विश्वचषकामध्ये भलेही भारताचा संघ सामील नसला तरी थेट कोल्हापूरचा झेंडा मात्र कतारमध्ये फडकणार आहे.
त्यामुळे देशभरातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर फुटबॉलप्रेमी कटरमध्ये जाऊन पोहोचले आहेत. २९ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतील पहिला सामना यजमान कतार आणि इक्वेडोरमध्ये खेळवला गेला. ज्यात यजमान संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. पाश्चात्य देशात जशी फुटबॉलची क्रेझ आहे तशीच भारताच्या महाराष्ट्रातील एक जिल्ह्यातही फुटबॉलची तशीच क्रेझ पाहायला मिळते. फुटबॉलची पंढरी म्हणणाऱ्या कोल्हापुरात शिखर संस्था कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आहे. या स्पोर्ट्स असोसिएशनचा झेंडा लवकरच फिफा विश्वचषकामध्ये फडकवण्यात येणार आहे आणि हे काम येथील स्थानिक तरुण करणार आहे. कोल्हापुरातील हा स्थानिक तरुण मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून कतार येथे नोकरीच्या निमित्ताने जाणार्या पन्हाळगडावरील एका युवकाने हा आगळावेगळा निर्धार केला आहे. या युवकाचे नाव अर्शिल समीर मुजावर आहे. तो येत्या बुधवारी केएसएचा ध्वज घेऊन कतारला जाण्यासाठी रवाना होणार आहे. जिथे फिफा विश्वचषक २०२२ खेळवला जात आहे.
अर्शिल हा सेंट झेवियर्स हायस्कूल व विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्याने फुटबॉलपटू, अॅथलिट म्हणून विविध स्पर्धांत सहभाग नोंदवला. पुण्याच्या ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनिअर ही पदवी त्याने प्राप्त केली. त्याला कतार येथे नोकरी लागल्याने तो येत्या बुधवारी कतारला रवाना होत आहे. फुटबॉल वर प्रेम असल्याने त्याने कतारच्या फुटबॉल सामन्यात कोल्हापूरचा झेंडा फडकवण्याचा निश्चय केला असून तो हा झेंडा घेऊन बुधवारी रवाना होत आहे.