
no images were found
भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी निष्पाप बालकाचा बळी देण्याचा प्रयत्न; दोघांना अटक
भुवनेश्वर : ओडिशातील देवगड जिल्ह्यात एका ६ वर्षाच्या निष्पाप बालकाचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मंदिराच्या पुजाऱ्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. हे लोक भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी एका निष्पाप बालकाचा बळी देणार होते.
देवगड पोलिस स्टेशनचे प्रभारी सुरेंद्र नायक यांनी सांगितलं की, बनिता बेहरा नावाच्या महिलेनं दावा केलाय, काही महिन्यांपासून तिच्या स्वप्नात भगवान शिव दिसत आहेत. भगवान शिवानं तिला स्वप्नात येऊन सांगितलं की, ‘मी एक मंदिरातच प्रकट होईन आणि तुला दर्शन देईन.’ देवाच्या दर्शनासाठी बनितानं पती निरंजनसह गावाजवळील झाडाची पूजा सुरू केली. भगवान शिव आपल्याला इथं दर्शन देतील, असं तिला वाटू लागलं. बराच काळ पूजा करूनही काही झालं नाही, तेव्हा तिनं मंदिराच्या पुजाऱ्याची भेट घेतली. पुजारी त्रिनाथ यांनी पती-पत्नीला सांगितलं की, ‘जर त्यांना परमेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांना मानवी बळी द्यावा लागेल.’ मानवी बळी देण्याच्या उद्देशानं निरंजन आणि मंदिराच्या पुजार्यागनं शनिवारी गावातून एका ६ वर्षाच्या मुलाचं अपहरण केलं.
ते दोघंही त्यांनी खोदलेल्या खड्ड्यात मुलाला पुरण्यासाठी जात होते. मात्र, ते त्याला दफन करण्याआधीच मुलानं आरडाओरडा करून तेथून पळ काढला. मुलानं धावत घरी जाऊन सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. यावर ग्रामस्थ झाडाजवळ पोहोचले असता, निरंजन आणि मंदिराचा पुजारी काळी जादू करत असल्याचं दिसलं. गावकऱ्यांनी जवळच खोदलेला खड्डाही पाहिला आणि पोलिसांना कळवलं. पोलिसांनी पुजारी आणि निरंजनला मानवी बळी देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे .