Home स्पोर्ट्स गरवारे वाई हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद;  3000 हून अधिक लोकांचा सहभाग

गरवारे वाई हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद;  3000 हून अधिक लोकांचा सहभाग

2 second read
0
0
155

no images were found

गरवारे वाई हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद;  3000 हून अधिक लोकांचा सहभाग

सातारा  : गरवारे वाई हाफ मॅरेथॉनच्या तिसर्‍या आवृत्तीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून रविवारी झालेल्या या हाफ मॅरेथॉनमध्ये 3000 हून अधिक लोकांनी सहभाग घेतला.टीम वाई स्पोर्टस फाऊंडेशनचे फीट इंडिया,हिट इंडिया मुव्हमेंट व स्थापनेपासून याचे मुख्य प्रायोजक असलेले गरवारे टेक्निकल फायबर्स लि.यांच्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा होता. या उपक्रमात पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,मुंबई व इतर भागातून धावपटू आणि नागरिकांनी आवर्जून सहभाग घेतला.
ही मॅरेथॉन 21 किमी,10 किमी आणि लहान मुलांसाठी 3 किमी या तीन प्रकारांत आयोजित करण्यात आली होती. ही मॅरेथॉन द्रविड हायस्कूल ग्राऊंडपासून सुरू झाली आणि महागणपती ब्रिज,गंगापुरी,भूगाव,मेणवली,वरखाडवाडी,धोम या मार्गाने होत याचा समारोप शिंदेवाडी येथे झाला. 10 किमी शर्यत मेणवलीपर्यंत होती तर किडस फन रनचे आयोजन ऋतूगंध हॉटेल  ते द्रविड हायस्कूल दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
या मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील लोकांनी भाग घेतला.विविध वयोगट आणि मॅरेथॉनच्या श्रेणीमधले तब्बल 39 सहभागींनी मेडल्स पटकावले.21 किमीची शर्यत 1 तास 9 मिनिटे आणि 43 सेकंदात पूर्ण करत बाळू पुकले यांनी पहिला क्रमांक पटकाविला.
गरवारे वाई हाफ मॅरेथॉनसाठी तब्बल दोन महिने तयारी सुरू होती.या मॅरेथॉनमध्ये गरवारे टेक्निकल फायबर्स लि.च्या 320 कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.या उपक्रमाचा मुख्य उद्देश्य हा आरोग्यपूर्ण जीवनशैलीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…