पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल: डॉ. सुधीर कुंभार कोल्हापूर, (प्रतिनिधी): पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल, म्हणून पर्यावरण समजून घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने कोते (ता. राधानगरी) येथील शासकीय आश्रमशाळेत आदिवासी आश्रमशाळा स्कूल कनेक्ट कार्यक्रमांतर्गत ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात …