no images were found
स्वच्छता ही जीवनशैली बनावी: चंद्रकांत कबाडे
कोल्हापूर,(प्रतिनिधी) : स्वच्छता ही केवळ जबाबदारी नसून आपल्या सर्वांची जीवनशैली बनली पाहिजे, असे प्रतिपादन दूरदर्शनचे प्रतिनिधी चंद्रकांत कबाडे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने आज ‘विशेष स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. त्या निमित्त कबाडे यांचे विशेष व्याख्यान झाले.
कबाडे म्हणाले, “स्वच्छ परिसर, स्वच्छ मन आणि स्वस्थ जीवन” हाच खरा संदेश आहे. तसेच कम्युनिकेशन डेव्हलपमेंट आणि सॅनिटायझेशन यामध्ये सहसंबंध आहे. प्रभावी संवाद फक्त शब्दांपुरता मर्यादित नसतो; त्यामागे शिस्त, जबाबदारी आणि स्वच्छतेची जाण असणेही महत्त्वाचे आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी विभागाचा परिसर आणि इमारतीची स्वच्छता केली. तसेच सुका आणि ओला कचरा वेगळा करण्यात आला.यावेळी विभाग प्रमुख डॉ. निशा पवार मुडे, डॉ. शिवाजी जाधव, विवेक पोर्लेकर यांच्यासह विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. विनोद पाटील यांनी आभार मानले.