Home Video न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक औषधनिर्माण दिनानिमित्त महिला सुरक्षितता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न 

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक औषधनिर्माण दिनानिमित्त महिला सुरक्षितता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न 

26 second read
0
0
105

no images were found

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक औषधनिर्माण दिनानिमित्त महिला सुरक्षितता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न 

कोल्हापूर(प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय कोल्हापूर विभागाच्या वतीने कोल्हापूर येथील न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक औषधनिर्माण दिनानिमित्त महिला सुरक्षितता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाले. महिलांना समाजात समानतेने आणि आत्मविश्वासाने जगता यावे यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध सरकारी योजना आणि कायद्यांची माहिती या चर्चासत्रात देण्यात आली.

कार्यक्रमासाठी अध्यक्ष मा. श्री. बी. जी. बोराडे, प्रमुख पाहुणे, तसेच मा. श्री. के. जी. पाटील, चेरमन, श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउस, प्रमुख उपस्थिती मा. श्री. सुहास वाईगडे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, कोल्हापूर, मा. श्री. अनिल तनपुरे, पोलीस निरीक्षक, गांधीनगर, पोलीस स्टेशन, प्राचार्य डॉ. सचिन पिशवीकर, मा. श्री. विनय पाटील इ. सर्व मान्यवर उपस्थीत होते. 

या कार्यशाळेचे उद्घाटन महिला व बाल विकास विभागाचे मा. श्री. विनायक चौगले, संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास तालुका करवीर यांचे  हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी महिलांविषयक कायदे याबद्दल सविस्तर सांगितले. महिलांचे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण हे कोणत्याही समाजाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शासनाच्या विविध योजना याबद्दल मार्गदर्शन केले.  

       त्यानंतर मा. श्रीमती. नीलम धनवडे , केंद्र प्रशासक, सखी वन स्टॉप सेंटर, कोल्हापूर यांनीही निराधार महिलांसाठी  उपाययोजना , पिडित महिलांसाठी कायदेविषयक मदत, रोजगार प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात याबद्दल मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ता, जिल्हा बालकल्याण कक्ष, मा. श्री. महेंद्र कांबळे साहेबांनी बाल विवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो कायदा व बालसंगोपन योजना याबद्दल सविस्तर माहिती विध्या विद्यार्थ्यांना दिली, त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या मा. श्रीमती. सीमा पाटील यांनी देखील बेटी बचाओ बेटी पाढाओ या विषयावर तसेच अंधश्रद्धा निर्मुलन यावर हि भाष्य केले. 

          तसेच मा. राधिका बुरांडे, समुपदेशक,आहान फाउंडेशन , रीस्पोन्सिबल नेटीझम, पुणे आणि मा. किरण बागुल , प्रोजेक्ट कॉर्डीनेटर, आहान फाउंडेशन , रीस्पोन्सिबल नेटीझम, पुणे यांनी सायबर सेल ,बुल्लिंग याबद्दल जागरूकता निर्माण केली व कायद्यांविषयी माहिती दिली.

या कार्याशाळेसाठी कॉलेजच्या विद्यार्थिनी, प्राध्यापिका आणि परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या एक दिवसीय कार्यक्रमामुळे महिलांना त्यांच्या हक्कांची आणि सक्षमीकरणाच्या मार्गांची माहिती मिळाली. तसेच, एक उत्तम व्यासपीठ मिळाले.

       या कार्यक्रमाचे संयोजन न्यू कॉलेज ऑफ फार्मसी आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या सहकार्याने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. रोहिणी ताटे,  प्रा. योगेश कोळेकर , प्रा. प्रज्ञा घरपणकर व प्रा. काजल मोहिते आयोजन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…