no images were found
एनआयटीचा पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमाचे १९ वे वर्ष
उंचगांव (प्रतिनिधी): येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमधील (आधीचे न्यू पॉलिटेक्निक) ग्रीन क्लब व सोशल क्लब आयोजित पर्यावरणपूरक गणपती विसर्जन उपक्रम श्री शाहू छत्रपती मिल्स चौक येथे यशस्वीरित्या पार पडला. नागरिकांनीही यास सकारात्मक प्रतिसाद दिला. यात विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्रा. अमोल कुलकर्णी, प्रा. रविंद्र यादव, प्रा. प्रविण जाधव, प्रा. सुभाष यादव व प्रा. संग्रामसिंह पाटील सहभागी होते. ४०० वर मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन या टीमकडून करण्यात आले. उपक्रमासाठी प्रा. विक्रम गवळी, अधिष्ठाता प्रा. बाजीराव राजिगरे यांचे सहकार्य तर संचालक डाॅ. संजय दाभोळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. एनआयटीकडून सदर उपक्रम वर्ष २००७ पासून दरवर्षी कोटीतीर्थ येथे राबवला जातो.