Oplus_0
no images were found
पर्यावरणभान आणि पत्रकारिता’ वर विद्यापीठात बुधवारी कार्यशाळा
कोल्हापूर (प्रतिनिधी ):शिवाजी विद्यापीठाचे पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि लक्ष्मी मल्टीपर्पज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. 8 रोजी ‘पर्यावरणभान आणि पत्रकारिता’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील जेष्ठ पत्रकार आणि पर्यावरण प्रश्नाचे अभ्यासक अनुप जयपूरकर आणि संदीप चोडणकर उपस्थित असणार आहेत. जयपूरकर पर्यावरण आणि पत्रकारिता या विषयावर तर चोडणकर हे जल साक्षरता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा सकाळी 10.30 वा. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनामध्ये होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे असतील. किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे हरिष सायवे आणि लक्ष्मी मल्टिपर्पज फौंडेशनचे विनायक देसाई यावेळी उपस्थित राहणार आहेत. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून निःशुल्क आहे. कार्यशाळेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर यांनी केले आहे.