स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत महानगरपालिकातर्फे विविध कार्यक्रम कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून घरोघरी तिरंगा या उपक्रमासाठी महानगरपालिकामार्फत 75 हजार झेंड्यांचे नियोजन केले आहे. अमृत महोत्सवाच्या उपक्रमानिमित्त शाळांमध्ये विविध स्पर्धा, बचत गट मिळावे, व्याख्यानमाला, स्वच्छता मोहीम याबरोबरच स्वातंत्र्य सेनानी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या महानगरपालिकेच्या वतीने भेटी घेण्यात येणार आहेत. या महोत्सवाबाबत विशेष …