Home सामाजिक टोयोटा किर्लोस्कर मोटरचे राष्ट्राच्या ऊर्जा आत्मनिर्भरता आणि कार्बन तटस्थ उद्दिष्टांमध्ये योगदान

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे राष्ट्राच्या ऊर्जा आत्मनिर्भरता आणि कार्बन तटस्थ उद्दिष्टांमध्ये योगदान

4 second read
0
0
28

no images were found

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे राष्ट्राच्या ऊर्जा आत्मनिर्भरता आणि कार्बन तटस्थ उद्दिष्टांमध्ये योगदा

* ऊर्जा स्वावलंबन आणि कार्बन न्यूट्रॅलिटीसाध्य करण्यासाठी भारताच्या नॅशनल हायड्रोजन मिशनला पाठिंबा देते. * प्रोटो एक्झामिनेशन आणि फिजिबिलिटी स्टडी साठी फ्युएल सेल कमर्शियल व्हेईकल (एफसी सीव्ही) तयार करण्यासाठी टीकेएम अशोक लेलँडला वन फ्युएलसेल मॉड्यूल पुरवते

बेंगळूरू  : प्रोड्यूसिंग हैप्पीनेस फॉर ऑल” या ध्येयाच्या अनुषंगाने, निसर्गाशी सुसंगत असा ‘भविष्य-प्रूफ’ शाश्वत समाज प्रस्थापित करण्यासाठी योगदान देऊ इच्छिणारी टोयोटा, सर्व प्रदेशांमध्ये शाश्वततेला चालना देणारे हरित आणि स्वच्छ तंत्रज्ञान विकसित करत आहे. विद्युतीकृत आणि इतर हरित वाहन तंत्रज्ञानामध्ये अग्रणी असल्याने, कंपनी प्रत्येक  देश/प्रदेशातील ऊर्जा निर्मिती, पायाभूत सुविधांची तयारी आणि ग्राहकांचा अवलंब विचारात घेऊन CO2 उत्सर्जन कमी करण्यासाठी विद्युतीकृत आणि पर्यायी इंधन वाहने देण्याचा प्रयत्न करते. 2035 पर्यंत मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्समध्ये नेट कार्बन झिरो गाठण्याच्या उद्दिष्टासह, जागतिक स्तरावर टोयोटा 2050 पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटीसाठी वचनबद्ध आहे.

फ्युएल सेल इलेक्ट्रिक वाहने (एफसी ईव्ही) हायड्रोजनद्वारे चालविली जातात जी सर्वात स्वच्छ इंधन म्हणून कोणतेही टेलपाइप उत्सर्जन करत नाहीत. ग्रीन हायड्रोजन अक्षय ऊर्जा स्त्रोतांपासून तयार केला जातो आणि सौर आणि पवन ऊर्जेसाठी साठवण आवश्यकता पुरवू शकतो जे त्यांच्या जलद गतीने मोठ्या प्रमाणावर टेक ऑफ करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हायड्रोजनची बॅटरीपेक्षा जास्त ऊर्जा घनता असते, ती जास्त काळासाठी ऊर्जा साठवू शकते आणि पोर्टेबल आहे, अशा प्रकारे ते विविध अनुप्रयोगांसाठी एक उत्कृष्ट ऊर्जा वाहक बनते. या फायद्यांसह, ऊर्जा स्वावलंबन आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने आपल्या देशाच्या ध्येयामध्ये हायड्रोजन महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.

व्यापक दृष्टीकोनातून, टोयोटा हायड्रोजन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत आहे, व्यापक अवलंब वाढविण्यासाठी आणि  स्केलेबिलिटी साध्य करण्यासाठी, विविध क्षेत्रांमध्ये फ्युएल सेल मॉड्युलच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. हायड्रोजन फ्युएल सेल मॉड्यूल विविध ऍप्लिकेशन्सची सेवा देण्यासाठी ऊर्जा स्त्रोत प्रदान करते जे स्पर्धात्मकता आणि भविष्यातील शाश्वत हायड्रोजन समाजाच्या निर्मितीसाठी मूलत: आवश्यक आहे. ट्रक आणि अवजड वाहतूक, ट्रेन, बस, विमान वाहतूक, शिपिंग, फोर्कलिफ्ट्स आणि औद्योगिक प्रक्रियांसारख्या आव्हानात्मक अनुप्रयोगांमध्ये शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी, हायड्रोजन महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. या दिशेने, टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज अशोक लेलँडला फ्युएल सेल मॉड्युल (एक युनिट) पुरवठा करण्याची घोषणा केली आहे ज्यामुळे प्रोटो एक्झामिनेशन आणि फिजिबिलिटी स्टडी साठी भारतात फ्युएल -सेल कमर्शिअल वाहन तयार केले जाईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…