no images were found
अभिनेता मोहित शर्मा म्हणतो: सायकल चालवणे माझ्यासाठी थेरपी
अनेकांसाठी सायकल चालवणे हा पसंतीचा कार्डियो वर्कआऊट प्रकार आहे, ज्यामधून अनेक फायदे मिळतात. रेडिओ जॉकीनंतर अभिनेता बनलेला आणि एण्ड टीव्हीवरील मालिका ‘दूसरी मॉं’मध्ये मनोजची भूमिका साकारणारा मोहित शर्मा प्रोफेशनल सायकलिस्ट आहे. त्याला सायकल चालवायला आवडते आणि आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत तोसायकल चालवतो. त्याला सायकल चालवणे थेरपीसारखे वाटते.
सायकल चालवण्याप्रती आपल्या आवडीबाबत सांगताना मालिका ‘दूसरी मॉं’मध्ये मनोजची भूमिका साकारणारा मोहित शर्मा म्हणाला, ‘‘माझ्या शालेय दिवसांमध्ये मी माझ्या मित्रांसोबत सायकल चालवण्याचा आनंद घ्यायचो. आम्ही रस्त्यांवर फेरफटका मारत धमाल करायचो. पण काळ पुढे सरकला आणि आम्ही बाइक्स व कार्स चालवायला लागलो. पण लॉकडाऊननंतर मी सायकल खरेदी करत माझ्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्याचे ठरवले. मी आतापर्यंतचा घेतलेला हा सर्वात उत्तम निर्णय ठरला. लॉकडाऊनदरमयान मला माझी सायकल चालवण्याची आणि जयपूरच्या मोकळ्या रस्त्यांवर फेरफटका मारण्याची, जुने मंदिर, स्मारकांना भेट देण्याची संधी मिळाली, तसेच मीमाझ्या जवळपास असलेल्या सुविधांचा आनंद घेतला. मी माझ्या कारमध्ये बसून ड्रायव्हिंग करताना या सुंदर दृश्यांना मिस केले असते. मी माझ्याजवळ असलेले जलस्रोत व नैसर्गिक भागांचा गूगल मॅप्सवर शोध घ्यायचो आणि तेथे माझ्या सायकलीवरून जायचो. यामुळे मला अनेक गोष्टींचा शोध घेता आला, ज्या मला यापूर्वी कधीच माहित नव्हत्या. याच काळादरम्यान मला माझ्या घराजवळ सुंदर तलाव पाहायला मिळाला. तसेच मी ३०० वर्षे जुने मंदिर देखील शोधले आणि जवळच्या गावामधील मास्टरजींना भेटलो, जे स्वातंत्र्य काळापासून तेथे राहतात. सायकलिंगमुळे मला अशा सुंदर ठिकाणांबाबत माहित झाले, जेथे मी जातो, बसतो आणि आराम करतो.’’सायकल चालवणे हा त्याचा छंद असण्यासोबत आरोग्यदायी राहण्यासाठी जीवनशैली देखील आहे. मोहित पुढे म्हणाला, ‘‘शारिरिकदृष्ट्या तंदुरूस्त आणि मानसिकदृष्ट्या शक्तिशाली असणे महत्त्वाचे आहे. माझ्या फिटनेस नित्यक्रमाचा भाग म्हणून मी दिवसाची सुरूवात सायकल चालवण्यासह करतो. मी शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहण्यासाठी सायकल चालवतो, पण माझ्यासाठी आता ते थेरपी ठरले आहे. सायकल चालवल्याने माझा तणाव व चिंता दूर होतात आणि मला आनंद होतो. मी सायकल चालवत असताना रस्त्यावर किंवा माझ्या लयीवर लक्ष केंद्रित केल्याने माझे अवधान वाढण्यास मदत होते आणि मी विद्यमान स्थितीबाबत जागरूक राहतो. मी आता ५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत सायकल चालवू शकतो आणि विविध सायकलिंग मॅरेथॉन्स व शर्यतींमध्ये स्पर्धा करू शकतो.’