Home मनोरंजन 80च्या दशकातील सुप्रसिद्ध गायक शब्बीर कुमार महान गायिका लता मंगेशकरसोबत गाण्याचा पहिला अनुभव शेअर करणार

80च्या दशकातील सुप्रसिद्ध गायक शब्बीर कुमार महान गायिका लता मंगेशकरसोबत गाण्याचा पहिला अनुभव शेअर करणार

2 second read
0
0
341

no images were found

80च्या दशकातील सुप्रसिद्ध गायक शब्बीर कुमार महान गायिका लता मंगेशकरसोबत गाण्याचा पहिला अनुभव शेअर करणार

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील द कपिल शर्मा शो 2023 या वर्षातील पहिला वीकएंड अमर्याद हास्य-विनोद, डान्स, सुरेल संगीत आणि कपिल व त्याच्या अतरंगी मोहल्ल्यातील वल्लींच्या गंमती-जम्मतींनी भरून टाकण्यासाठी सरसावला आहे. या रजनीला सुरेल साथ देण्यासाठी 80 आणि 90च्या दशकातील लोकप्रिय गायक- शब्बीर कुमार, अल्ताफ राजा, सुनीता राव आणि श्वेता शेट्टी उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमाची रंजकता वाढवत गायक शब्बीर कुमार ‘परबतों से आज मैं टकरा गया’ म्हणत-म्हणत एंट्री घेईल आणि अल्ताफ राजा आणि सुनीता राव त्यांची गाजलेली गाणी ‘तुम तो ठहरे परदेसी’ आणि ‘परी हूं मैं’ गाताना दिसतील. 80 आणि 90च्या दशकातील आठवणींना उजाळा देत श्वेता शेट्टी आपल्या आवाजातील ‘दीवाने तो दीवाने है’ हे गाणे सादर करून या कार्यक्रमाला चार चाँद लावेल. नवीन वर्षाचा हा पहिला आठवडा संस्मरणीय व्हावा याची काळजी घेत कपिल आणि त्याचा अतरंगी परिवार सर्वांना भरपूर हसवतील.

गप्पांचा फड रंगेल आणि पाहुणे मंडळी आपल्या गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. 80च्या दशकातील बेताब, कुली, मर्द, वो 7 दिन वगैरे चित्रपटांमध्ये काही सुपरहिट गाणी गाणारा शब्बीर कुमार स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सोबत गाण्याचा आपला पहिला अनुभव शेअर करताना दिसेल. तो म्हणाला, “मी पंचमदांसाठी बेताब चित्रपटाची गाणी रेकॉर्ड करत होतो. त्यावेळी मला दिदींसोबत गाण्याची संधी मिळाली. तीमाझ्या जीवनातील एक मोठी सिद्धीच होती, असेही म्हणता येईल. सुरूवातीला तर मला हे माहीतच नव्हते की, मला लता दीदींसोबत एक युगलगीत देखील गायचे आहे. पंचमदांनी मला ते गाणे रेकॉर्ड करण्याच्या थोडाच वेळ आधी सांगितले. मला तर धक्काच बसला की,त्यांच्यासारखी महान गायिका माझ्यासारख्या नवख्या गायकासोबत, कोणतीही स्वरपरीक्षा न घेता गाण्यासाठी कशी तयार झाली!कारण, जर मी त्यांच्या जागी असतो, तर मी अशा नवशिक्या गायकाबरोबर गायलोच नसतो किंवा मग आधी त्याची एक चाचणी तरी घेतलीच असती. पण मी मात्र कोणतीही परीक्षा न देता लताजींसोबत गात होतो ‘बादल यूं गरजता है’. लताजींचा आवाज ऐकून मी इतका मंत्रमुग्ध होऊन जात होतो की, माझ्या ओळी गाण्याच्या वेळी मी काही तरी गडबड करत असे. हे परत परत होऊ लागले तसे, लता दीदींच्या ते ध्यानी आले. मी भांबावलो आहे हे त्यांनी ताडले, म्हणून त्यांनी पंचमदांना एक विराम घेण्याची विनंती केली.या वेळेत दिदींनी मला त्यांच्यासोबत चहा पिण्याचा आग्रह केला, आणि मी तत्काळ हो म्हटले. माझ्याशी त्यांनी माझे घर, माझे कुटुंब इ. बाबतीत मनमोकळे संभाषण सुरू ठेवले, जेणे करून माझे दडपण कमी व्हावे. हळूहळू मी जरा शिथिल होऊ लागलो. त्यांच्या आसपास असण्याची मला सवय झाली आणि मग आम्ही ते गाणे रेकॉर्ड केले.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …