
no images were found
विजय झोल यांचेवर मोठ्या कारवाईची शक्यता
क्रिप्टोकरंसीमध्ये 500 कोटींचा घोटाळा प्रकरणी अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
टीम इंडियाचा अंडर 2019चा माजी कर्णधार विजय झोल याचेवर गुन्हा दाखल झाला आहे. विजय झोल हे शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांचे जावई आहेत. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातून उद्योजक किरण खरात यांना पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप विजय झोल यांचेवर करण्यात आला आहे.
विजय झोल यांच्यावर कारवाई होणार असल्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. क्रिप्टोकरंसीमध्ये 500 कोटींचा घोटाळा प्रकरणी अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण खरात (ता. घनसावंगी) हे क्रिप्टो करंसीमध्ये प्रमोटर म्हणून काम पाहत होते. यामध्ये मोठा घोटाळा झाल्याची तक्रार जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी पोलिसात नोंद करण्यात आली असून विजय झोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार किरण खरात यांनी आरोप केला आहे की, क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून विजय झोल यांनी गुंतवणूक केली, ज्यात या क्रिप्टो करन्सीचा मार्केट व्हॅल्यू घसरल्याने आपल्याला त्यात दोषी धरून क्रिकेटर विजय झोल आणि त्यांच्या भावाने घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी क्रिकेटर विजय झोल आणि त्याचा भाऊ विक्रम झोल याच्यासह 15 जणांवर घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर किरण खरात यांनी 500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांच्याकडून करण्यात आला आहे.