Home शासकीय महसुल सप्ताहात माजी सैनिक, वीर पत्नी, वीरमातांनी विविध दाखले प्राप्त करुन घेण्याचे आवाहन

महसुल सप्ताहात माजी सैनिक, वीर पत्नी, वीरमातांनी विविध दाखले प्राप्त करुन घेण्याचे आवाहन

11 second read
0
0
61

no images were found

महसुल सप्ताहात माजी सैनिक, वीर पत्नी, वीरमातांनी विविध दाखले प्राप्त करुन घेण्याचे आवाहन

 

 कोल्हापूर : जिल्ह्यात महसुल व वन विभागाव्दारे दिनांक 1 ऑगस्ट  ते  7 ऑगस्ट 2024 या दरम्यान  महसुल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत 5 ऑगस्ट रोजी होणारा “सैनिक हो तुमच्यासाठी” कार्यक्रम 10 ऑगस्ट 2024 रोजी राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीरमाता व त्यांचे अवलंबीत माजी सैनिकांनी त्यांच्या महसुल संबधिच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी संबंधित तालुक्यातील तहसिलदार कार्यालयात निवेदन देवून आवश्यक असणारे  महसुल कार्यालयाकडुन निर्गमित होणारे विविध दाखले प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल (निवृत्त) डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशानुसार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी” हा कार्यक्रम तालुका स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शहीद सैनिकांची वीर पत्नी, वीर माता, वीर पिता यांचा सन्मान करण्यात येणार आहे.  तसेच जिल्ह्यातील सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीरमाता व त्यांचे अवलंबीत यांचे महसुल संदर्भातील तक्रारींचे निराकरण प्राधान्याने करण्यात येणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…