
no images were found
शिवाजी विद्यापीठाच्या गणित अधिविभागामध्ये रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी): गणित अधिविभाग व आरोग्य केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 30 जुलै 2024 रोजी गणित अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे रक्तदान शिबीर यशस्वीरित्या पार पडले. शिबीरामध्ये शिवाजी विद्यापीठातील वेगवेगळया अधिविभागातील 34 विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी रक्तदान केले.
या शिबीराचे आयोजन करण्यासाठी गणित अधिविभागाच्या विभागप्रमुख व विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. एस. एच. ठकार तसेच शिवाजी विद्यापीठाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. ए. रानडे यांनी मार्गदर्शन केले. शिबीराचे आयोजन गणित अधिविभागातील डॉ. एस. एस. कुंभार आणि श्री. एस. डी. थिटे यांनी केले. या शिबीरामध्ये रक्तसंकलनाचे काम छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालय, कोल्हापूर येथील डॉ. सुप्रिया लोखंडे, डॉ. जान्हवी चव्हाण, दत्तात्रय ऐवळे, मन्सूर बारगीर, जयवंत कदम, ओंकार देसाई, यश गायकवाड, राहूल धनवडे आणि दामोदर कामत या वैद्यकीय पथकाने केले. हे शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गणित अधिविभागातील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.