
no images were found
फ्रेण्डशीप डेला या कलाकारांच्या बाबतीत काय घडले यावर तुमचा विश्वास बसणार नाही
फ्रेण्डशीप डे हा खास प्रसंग आहे, जो मित्रांसोबतच्या अतूट नात्याला साजरे करतो. या खास दिनी, व्यक्ती वेळात वेळ काढून त्यांच्या जिवलग मित्रांना भेटतात, एकत्र वेळ व्यतित करतात आणि अधिक आनंद साजरा करत संस्मरणीय आठवणी तयार करतात. आपल्या जिवलग मित्रांसोबतचे असे उत्साही क्षण व सरप्राइजेजना उजाळा देत एण्ड टीव्ही कलाकार त्यांच्या हृदयस्पर्शी कथांबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत आशुतोष कुलकर्णी (मालिका ‘अटल’मधील क्रिष्णन बिहारी वाजपेयी), अमित भारद्वाज (मालिका ‘भीमा’मधील मेवा), गीतांजली मिश्रा (मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील राजेश) आणि रोहिताश्व गौड (मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील मनमोहन तिवारी). अशाच एका संस्मरणीय क्षणाबाबत सांगताना मालिका ‘अटल’मध्ये क्रिष्णन बिहारी वाजपेयीची भूमिका साकारणारे आशुतोष कुलकर्णी म्हणाले, ”माझ्या बॅचलर दिवसांमध्ये मी एका मित्रासोबत भाड्याच्या घरामध्ये राहायचो, जो नाइट शिफ्ट्समध्ये काम करायचा आणि सकाळी घरी परत यायचा. एकदा वीकेण्डला आलेल्या फ्रेण्डशीप डेला तो कामावरून घरी परतला आणि मी त्याला सांगितले की आपण मुंबईच्या बाहेर फिरायला जाऊया. त्याने आनंदाने होकार दिला, पण कारमध्ये झोपी गेला. ती संधी साधत मी त्याची लोणावळाला जाण्याची दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण करण्याचे ठरवते, जेथे तो चार महिन्यांपासून जाण्याचे स्वप्न पाहत होता, पण व्यस्त कामामुळे जाऊ शकत नव्हता. तो गाढ झोपी गेला होता, ज्यामुळे मी कार लोणावळ्याच्या दिशेने नेली. तो झोपेतून उठल्यानंतर आम्ही कुठे आलो आहोत हे समजल्यावर त्याला खूप आनंद झाला आणि सरप्राइज पाहून भारावून गेला. त्याने मला घट्ट मिठी मारली. आम्ही तो दिवस आनंदाने व्यतित केला, लोणवळ्याच्या टेकड्यांवर चहाचा आस्वाद घेत उत्साहवर्धक वातावरणाचा आनंद घेतला.” मालिका ‘भीमा’मध्ये मेवाची भूमिका साकारणारे अमित भारद्वाज म्हणाले, ”माझा मित्रांचा ग्रुप आहे, ज्यांनी माझ्या प्रवासामध्ये मोठे योगदान दिले आहे. प्रत्येकजण माझ्यासाठी अत्यंत खास आहे, पण माझा लहान भाऊ सुमित बालपणापासून माझा जिवलग मित्र आहे, माझ्या मनात त्याच्यासाठी खास स्थान आहे. गेल्या वर्षी, त्याने मला हृदयस्पर्शी सरप्राइज दिले. माझा फोन अचानक हरवला आणि माझ्या भावाने आईकडून नवीन फोन घेऊन दिला. त्याने त्वरित माझ्या पत्नीला कॉल करून मी कोणता नवीन फोन विकत घ्यायचा विचार करत आहे याबाबत विचारले. त्यांच्या प्लॅनबाबत मला काहीच माहित नव्हजे, ज्यामुळे मी बाजारपेठेतील सर्वात महागड्या फोनचा उल्लेख केला, पण म्हणालो की फोन खूप महागडा असल्यामुळे खरेदी करू शकत नाही, म्हणून मी दुसरा फोन पाहत आहे. माझ्या पत्नीने त्याला याबाबत सांगितले आणि दुसऱ्या दिवशी, माझ्या हातामध्ये तो फोन होता. त्याने मला सरप्राइज देण्यासाठी माझ्या पत्नीच्या खात्यामध्ये पैसे पाठवले होते आणि तिने मला माझ्या भावाने फोन दिल्याचे सांगितले तेव्हा मी खूप भावूक झालो. म्हणून ते गिफ्ट आणि त्याचा गेस्चर माझ्यासाठी सर्वात संस्मरणीय आहेत.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये राजेशची भूमिका साकारणाऱ्या गीतांजली मिश्रा म्हणाल्या, ”वास्तविक जीवनात माझी जिवलग मैत्रीण सपना सिकरवार आहे, जी मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये माझी बहीण बिमलेशची भूमिका साकारत आहे. आम्ही एकमेकींना जवळपास दहा वर्षांपासून ओळखतो, पण मी मालिकेमध्ये सामील झाल्यापासून आमचे नाते अधिक दृढ झाले आहे. आम्ही सेटवर एकत्र जेवणाचा आस्वाद घेतो आणि तिचे पॅक-अप लवकर झाले की माझी वाट पाहते किंवा माझा कॉल टाइम उशिरा असला तरी मी लवकर येते, ज्यामुळे आम्ही एकत्र जेवणाचा आस्वाद घेण्यासोबत गप्पागोष्टी करू शकतो. एकदा नाही, तर दररोज ती माझे आवडते जेवण घेऊन येते आणि मला सरप्राइज करते. म्हणून, फक्त एका सरप्राइजबाबत सांगायचे झाले तर तिच्यासाठी अन्याय असेल (हसतात). खरी मैत्री कायम राहते आणि दूर असले तरी एकमेकांची काळजी घेणे आवश्यक आहे. सपना अशी मैत्रीण आहे, जी कधी-कधी मला आव्हानात्मक स्थितीमध्ये अडकवते (हसतात). एकत्र असल्यास आम्ही इतरांसाठी समस्या निर्माण करतो.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारे रोहिताश्व गौड म्हणाले, ”पूर्वी, मित्रांमधील, विशेषत: पुरूष मित्रांमधील सरप्राइजेज जवळपास ऐकण्यात नव्हते. मला आजही माझा बालपणीचा जिवलग मित्र हरप्रीत सिंग ब्रार आठवतो, जो उत्तम पेंटर आहे आणि त्याने अनेकदा माझ्यासारख्या व्यक्तींचे वास्तविक पोर्ट्रेट्स काढले आहेत. आम्ही कालका या एकाच शहरातील आर्टिस्ट्स असल्यामुळे आमच्यामध्ये त्वरित नाते जुंपले. मला प्रोजेक्टर्सवर चित्रपट पाहायला आवडायचे. एकेदिवशी, मला खेळण्याच्या दुकानामध्ये लहान प्रोजेक्टर दिसले, ज्याची किंमत दहा रूपये होती. त्यामध्ये विविध मूव्ही रील्स होत्या, ज्यामुळे ते लक्षवेधक होते. मी दुकानदाराला तो प्रोजेक्टर देण्याची आणि त्यासाठी नंतर पैसे देण्याची विनंती केली. पण, मी वेळेवर दुकानदाराला पैसे देऊ शकलो नाही, ज्यामुळे दुकानदाराने माझ्या वडिलांना त्याबाबत सांगण्याची धमकी दिली. यामुळे मला खूप भिती वाटली. हरप्रीतने मला सल्ला दिला की, वडिलांचे ओरडणे टाळण्यासाठी मी माझ्या आईला सर्वकाही सांगितले पाहिजे. मी माझ्या आईला त्याबाबत सांगितले, तेव्हा प्रथम आई मला ओरडली, पण त्यापैकी काही रक्कम फेडण्यासाठी पाच रूपये दिले. मी हरप्रीतचे पाठिंबा देण्यासाठी आभार मानले आणि अचंबित करणारी बाब म्हणजे त्याने देखील माझ्यासाठी पाच रूपये गोळा केले होते. आम्ही एकत्रित दुकानदाराला पैशाची परतफेड केली आणि मी माझ्या जीवनातील सर्वात आनंदी दिवसाचा अनुभव घेतला.”