
no images were found
भेटा शबीर आहलुवालियाच्या ‘फरी फ्रेंड’ला!
आजच्या धावपळीच्या जगामध्ये, जिथे काही मानवी नातेसंबंध तात्पुरत्या काळासाठी टिकतात, पण आपले फरी फ्रेंड्स मात्र आपले सर्वांत ईमानदार जोडीदार बनतात. आपले पाळीव प्राणी आपल्या बिनशर्त प्रेम, भावनिक आधार आणि सुरक्षेची भावना प्रदान करतात आणि अनेकदा ते आपल्या परिवाराचा अतिशय महत्त्वाचा हिस्सा बनून जातात. हीच संकल्पना ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’मध्ये खूपच सुंदर पद्धतीने मांडण्यात आली असून त्यात आपल्या शबीर आहलुवालियाची व्यक्तिरेखा मोहन आणि त्याचा ऑनस्क्रीन मुलगा मनन (शौर्य विजयवर्गिया) यांचा पाळीव कुत्रा चंपी यांच्यामधील प्रेमाचे नाते पाहायला मिळते. तो केवळ त्यांचा पाळीव प्राणी नाही तर हल्लीच जेव्हा युग (मनित जौरा) मननला किडनॅप करतो तेव्हा मोहनला मननपर्यंत घेऊन जाण्यामध्येही चंपीने महत्त्वाची भूमिका बजावली.
कुत्र्यांवरील आपले प्रेम आणि त्यांच्यासोबत चित्रीकरण करण्याचा अनुभव यांबद्दल शबीरने उत्साहाने सांगितले,“चंपी ह्या अतिशय देखण्या लॅब्रेडॉरसोबत आमच्या शोमध्ये काम करण्याचा अनुभव खूपच छान आहे. अगदी पहिल्या दिवसापासून त्याची हुशारी आणि मैत्रीपूर्ण वागणे हे मला खास वाटले आणि त्यामुळे आमचे प्रत्येक चित्रीकरण अगदी सहज आणि आनंददायी बनले. चंपीला दिलेल्या कमांड्स तो अगदी पटकन शिकतो आणि परफॉर्म करण्यासाठी तो कायम उत्साहात असतो. त्याला पाहून मी थक्क होतो. त्याचा खेळकरपणा सेटवर एक प्रकारचे उजळ चैतन्य आणते आणि अख्ख्या क्रू ला तो आपलासा वाटतो. त्याच्या गंमतीजंमती आणि आमच्या कलाकारांसोबतचे त्याचे नाते आमच्या मालिकेला आणखी ऊबदार बनवते. एवढ्या हुशार आणि प्रेमळ कुत्रासोबत काम करण्याचा अनुभव निश्चितपणे छान आहे.”
शबीरला सेटवर चंपीसोबत चित्रीकरण करताना मजा येत असून ‘हम आपके है कौन’ चित्रपटातही त्या परिवाराचा पाळलेला कुत्रा ‘टफी’ याच्यासोबत असेच महत्त्वपूर्ण दृश्य होते. त्यात माधुरी दिक्षित साकारत असलेली व्यक्तिरेखा निशाचे लग्न तिचे प्रेम असलेल्या प्रेम ऊर्फ सलमान खानशी होण्यामध्ये ‘टफी’नेही महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.