no images were found
साथीच्या रोगाने त्याच्या बरोबर आणलेल्या अनिश्चिततेच्या भावनेस टिपणारा ‘सोमोयेर स्मृतीमाला’ चित्रपट सादर
रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सने आज ‘सोमोयेर स्मृतीमाला’ (काळाच्या ओघातील आठवणी) नावाचा त्यांचा नवीनतम लघुपट प्रदर्शित केला. गौतम घोष दिग्दर्शित 35 मिनिटांच्या या चित्रपटात, कोलकात्याच्या मध्यभागी राहणाऱ्या एका जोडप्याच्या – चाळीशीच्या उत्तरार्धातील एक लेखक, कबीर बसू (सुमन मुखोपाध्याय यांनी साकारलेली भूमिका), आणि त्यांची पत्नी सुमिता (गार्गी रॉय चौधरी यांनी साकारलेली भूमिका) या शिक्षकेच्या दृष्टीकोनातून, लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेची आणि अस्वस्थतेची भावना दाखवण्यात आली आहे.
‘सोमोयेर स्मृतीमाला’ हा महामारीच्या सुरुवातीच्या काळातील एक मार्मिक चित्रपट आहे; या चित्रपटाच्या सुरुवातीच्या एका फ्रेममध्ये ’25 मार्च 2020 – देशव्यापी लॉकडाऊन’ म्हटले गेले आहे. चित्रपटाची सुरुवात, कबीर आणि सुमिता ग्रामीण भागात रस्त्याने सहलीवर निघालेले असताना, त्यांच्या ताज्या हवेच्या आणि शांततेच्या शोधापासून होते.
या लघुपटाबद्दल बोलताना चित्रपट निर्माते गौतम घोष म्हणाले, “महामारीच्या काळात अनुभवलेल्या भावना 35 मिनिटांत टिपणे जवळजवळ अशक्य आहे. सोमोयेर स्मृतीमाला हा कोलकात्यात राहणाऱ्या एका जोडप्याच्या दृष्टिकोनातून महामारीच्या काळात आपल्या आजूबाजूचे जग कसे बदलले हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. यात, या महामारीचा नातेसंबंधांवर आणि मानवी मानसिकतेवर कसा परिणाम झाला, याचा गूढ पद्धतीने शोध घेण्यात आला आहे. हा चित्रपट रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सच्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असे मला वाटते.”
अभिनेत्री सुमन मुखोपाध्याय म्हणाल्या, “रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स प्लॅटफॉर्म हे, त्याच्याद्वारे प्रेक्षकांसाठी आणल्या गेलेल्या मनोरंजक कथांसाठी लोकप्रिय आहे. सोमोयेर स्मृतीमालेमध्ये महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटांचे आणि परिणामी लॉकडाऊनचे अनावरण कसे करते, हे अद्वितीयपणे दाखवण्यात आले आहे.
अभिनेत्री गार्गी रॉय चौधरी म्हणाल्या, “माझी व्यक्तिरेखा सुमिता, जी एक शिक्षिका आहे, ती महामारीमुळे उद्भवलेल्या एकाकीपणाचा सामना करण्यासाठी संघर्ष करते. मला वाटते की, बऱ्याच प्रेक्षकांना हे त्यांच्याशी संबंधित असल्याचे वाटेल. पण शेवटी तिला निसर्गातच दिलासा मिळतो.
सोमोयेर स्मृतीमालाचे प्रीमियर, रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्टच्या लार्ज शॉर्ट फिल्म्स यूट्यूब चॅनेलवर होणार आहे, जे भारतातील काही उत्कृष्ट अभिनेत्यांचे आणि दिग्दर्शकांचे सर्वात मौलिक आणि प्रेरणादायक लघुपट पाहण्याचे एक व्यासपीठ आहे.