Home मनोरंजन सोनी सबवरील वंशजमध्ये मोठा ट्विस्ट, यशची तब्येत खालवत असतानाच युविका-नीलचे लग्न…

सोनी सबवरील वंशजमध्ये मोठा ट्विस्ट, यशची तब्येत खालवत असतानाच युविका-नीलचे लग्न…

7 second read
0
0
17

no images were found

सोनी सबवरील वंशजमध्ये मोठा ट्विस्ट, यशची तब्येत खालवत असतानाच युविका-नीलचे लग्न…

सोनी सबवरील वंशज मालिकेत समाजातील लिंग आधारीत वारसा हक्काचा वाद दर्शवण्यात आला आहे. तलवार आणि महाजन कुटुंबातील कट्टर शत्रुत्वामुळे मालिकेत नवा टर्न आला आहे. नुकत्याच झालेल्या भागात, महाजन कुटुंब युविका (अंजली तत्रारी) आणि नील (मोहित कुमार) च्या लग्नाची तयारी करत आहे. तेव्हाच युविकाला बातमी कळते की, ऑटोमोटिव्ह अथॉरिटी ऑफ इंडियाने युविकाचे इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याचे लायसन्स नाकारले.

 एकिकडे महाजन कुटुंब लग्नाचा विधी आणि त्याची तयारी करण्यात बिझी आहे तर दुसरीकडे युविका यश तलवारशी (शालीन मल्होत्रा) स्पर्धा करत एक मोठा करार करते. तलवारच्या कुटुंबातही, यशला हृदयाचा त्रास होत असल्यामुळे सगळे संकटात असतात. यशला तत्काळ हृदय प्रत्यारोपणाची गरज असते. लवकरात लवकर एखादा दाता शोधण्यावर संपूर्ण तलवार कुटुंबाचं एकमत होतं.

 या आठवड्यात मालिकेत आणखी वळणे येतील. यशला कोण हृदय देईल, नील आणि युविकाचे लग्न होईल का? हे पाहताना प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसेल.

 वंशजमध्ये युविका महाजनची भूमिका करणारी अंजली ततरारी म्हणते, ‘महाजन कुटुंबाचा वारसा हाती घेणं ही युविकाची सुरुवात आहे. यश तलवारला मागे टाकत तिला कुशल व्यावसायिक म्हणून स्वत:ला सिद्ध करायचे आहे. नीलसोबत लग्नाच्या तयारीत ती बिझी असतानाच व्यवसायातील मोठा करार करण्यावरही लक्ष केंद्रीत ठेवते. आता व्यवसायात तिने अजून एक पाऊल पुढे ठेवले आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यातही ती एक पाऊल पुढे टाकण्याच्या तयारीत आहे, नीलच्या दिशेने ती हे पाऊल पुढे टाकत आहे. ’

 वंशज मालिकेत यश तलवारची भूमिका करणारा शालीन मल्होत्रा म्हणातो,दोन कुटुंबातील शत्रुत्वामुळे यश आणि युविकात मोठे शत्रुत्व निर्माण झाले आहे. या कुटुंबाला नेस्तनाबूत करण्याची शपथ तो घेतो, मात्र हृदयाची खालावत चाललेल्या स्थितीमुळे त्याच्यासमोर नवे आव्हान उभे आहे. या आजारावर मात करण्यासाठी हृदय प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय आहे. या जीवन- मरणाच्या स्थितीतून यश कसा बाहेर निघतो, हे घडलंच तर महाजन कुटुंब ही स्थिती कशी हाताळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सजना चित्रपटाचं धमाल गाणं “बुंगा फाईट” सर्वत्र धुमाकूळ घालतंय !!

सजना चित्रपटाचं धमाल गाणं “बुंगा फाईट” सर्वत्र धुमाकूळ घालतंय !!   मराठी …