Home मनोरंजन सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पा आईच्या जबाबदाऱ्यांपासून निवृत्ती घेते…

सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पा आईच्या जबाबदाऱ्यांपासून निवृत्ती घेते…

8 second read
0
0
16

no images were found

सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पा आईच्या जबाबदाऱ्यांपासून निवृत्ती घेते…

 

सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत  पुष्पा (करुणा पांडे) या जिद्दी महिलेचे कथानक असून ती आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना ती प्रचंड सकारात्मकतेने तोंड देत असते. नुकत्याच झालेल्या भागात, प्रेक्षकांनी पाहिले की, प्रार्थना (इद्राक्षी कानीजल ) हिच्या मिसकॅरेजमुळे तिच्या आणि दीप्ती (गरीमा परिहार)मधील तणाव वाढतो. त्यामुळे गैरसमज आणि वाद वाढतात.

प्रार्थना आणि दीप्तीमधील वाढत्या तणावामुळे पुष्पावरील घरातल्या जबाबदाऱ्या वाढून जातात. त्यामुळे लहान-लहान भांडणं आणि गोंधळाची स्थिती निर्माण होते. बाथरूम वापरण्यापासन ते जेवायला काय करायचे, यासारख्या मुद्द्यांवरून कुटुंबात वाद होतात. या सगळ्यांसाठी सर्वजण पुष्पाला जबाबदार धरतात. तिनेच या दोघींना चाळ सोडवण्यापासून परावृत्त केलेले असते. निराश झालेली पुष्पा आईची जबाबदारी न घेण्याचा निर्णय घेते आणि या निर्णयामुळे मोठे वळण येते. तिने आईची कामं सोडून दिल्यामुळे घरात पुन्हा वाद सुरु होतात. पुष्पाने ही कामं सोडल्यानंतर घरातल्या कामांची जबाबदारी कुणीच घेत नाही. हे पाहून प्रार्थना समोर येऊन ही जबाबदारी घेते.

   पुष्पा तिच्या मुलांना आणि त्यांच्या निर्णयांना खरच दूर करेल का?

पुष्पा रंदेरीया ची भूमिका करणारी करुणा पांडे म्हणते, ‘ पुढील भागात मालिकेतला प्रमुख टर्निंग पॉइंट येईल. सतत पाठिंबा देणारी आई अशा भूमिकेतील पुष्पा, तिच्या घरातील सततच्या दोषारोप आणि वादांना कंटाळते. आईच्या जबाबदाऱ्या सोडून देण्याचा निर्णय कठीण आहे. मात्र तिला किती त्रास होत आहे, हे मुलांना दाखवून देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. पुष्पाची मुलं पुन्हा योग्य वाटेवर कशी येतात आणि पु्ष्पाला पुन्हा आईच्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी कसे समजवतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.’

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…