no images were found
‘दिल दियाँ गल्लाँ’मध्ये तरूण पिढी वीर व अमृता ब्रार कुटुंबाच्या जुन्या पिढीतील सदस्यांना एकत्र आणतील का?
सोनी सबवरील स्थलांतर व गैरसमजावर आधारित कौटुंबिक मालिका ‘दिल दियाँ गल्लाँ’ भावनिक वळण घेणार आहे. मालिकेचे कथानक स्थलांतराच्या परिणामांमुळे विभक्त झालेल्या पंजाबी कुटुंबाच्या अवतीभोवती फिरते. अमृताला अखेर समजते की, दिलप्रीत तिचे आजोबा आहेत आणि हे समजल्यानंतर ती खूप भावूक होते.
मागील एपिसोड्समध्ये पाहायला मिळाले की रियाला अमृता तिचे काका मनदीपची मुलगी असल्याचे समजते. काकाच्या कुटुंबाने आजोबांचे, तसेच वडिल रणदीपचे मन दुखावले असल्यामुळे रिया त्यांचा कधीच स्वीकार न करण्याचे ठरवते. दुसरीकडे अमृता राहत असलेले घर तिच्या आजोबांचे असल्यावर समजल्यानंतर तेथून निघून जाण्याचे ठरवते. पण वीर तिच्या वडिलांसाठी राहण्यास व बोलण्यास तिचे मन वळवतो. रिया अमृताचा आपली चुलत बहीण म्हणून स्वीकार करेल का? रिया अमृताबाबत कोणता निर्णय घेईल? हे पाहणे रोचक असणार आहे.
वीर व अमृता एकत्र ब्रार कुटुंबामधील अंतर दूर करतील का?
वीरची भूमिका साकारणारा पारस अरोरा म्हणाला, ‘‘वीरला दिलप्रीत व संजोत खूप आवडतात आणि त्यांचे कुटुंब एकत्र यावे अशी त्याची इच्छा आहे. म्हणून तो कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी त्याच्यापरीने सर्वकाही करेल. तो अमृताला राहण्यास आणि कुटुंबाच्या सदस्यांमधील गैरसमज दूर करण्यास भाग पाडतो. माझ्या मते, प्रत्येकाला दुसरी संधी मिळाली पाहिजे आणि मोठ्यात मोठ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही आमच्या मालिकेच्या माध्यमातून हीच बाब दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मग पाहत राहा ‘दिल दियाँ गल्लाँ’ फक्त सोनी सबवर.’’