no images were found
उमेदवारांच्या निवडणूक विषयक खर्चाचे लेखे, नोंदवह्याची तपासणी करुन घ्यावी – हरिष धार्मिक
कोल्हापूर : लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 77 नुसार उमेदवारांनी निवडणुकीमध्ये नामनिर्देशन दाखल केलेल्या दिनांकापासून निवडणूक निकाल लागेपर्यतच्या दिनांकाच्या (दोन्ही दिवस धरुन) केलेल्या खर्चाचे स्वतंत्र व अचुक लेखे नोंदवह्या ठेवणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने नमुद दिनांकास सर्किट हाऊस, कोल्हापूर येथील हॉल येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत या मतदार संघांतर्गत उमेदवार, त्यांचे खर्च प्रतिनिधी, अन्य प्राधिकृत प्रतिनिधी यांनी निवडणूक खर्च विषयक लेखे, नोंदवह्या, मूळ प्रमाणके (बिल्स), बँक पासबुक/स्टेटमेंट छायांकित प्रत तसेच इतर अनुषंगिक कागदपत्रे घेवून उपस्थित रहावे, असे आवाहन 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा करवीरचे उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी केले आहे.
या खर्च विषयक नोंदवह्या, लेखे यांची खर्च निरीक्षक यांच्याकडून संपुर्ण प्रचार कालावधीमध्ये किमान 3 (तीन) वेळा तपासणी करुन घेणे अनिवार्य आहे.त्यानुसार 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील सर्व उमेदवारांच्या खर्च विषयक नोंदवही खर्च निरीक्षकांकडून तपासणी करुन घेण्यासाठी खालील प्रमाणे तपासणीचे दिनांक अधिसुचित करण्यात येत आहेत.
प्रथम तपासणी- दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी, ज्या दिनांक अखेर खर्चाची तपासणी होणार
आहे तो दिनांक – 6 नोव्हेंबर 2024
व्दितीय तपासणी – दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी, ज्या दिनांक अखेर खर्चाची तपासणी होणार
आहे तो दिनांक – 11 नोव्हेंबर 2024
तृतीय तपासणी – दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी, ज्या दिनांक अखेर खर्चाची तपासणी होणार
आहे तो दिनांक – 15 नोव्हेंबर 2024 याप्रमाणे आहे.