no images were found
निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र बँकेत तात्काळ सादर करावेत – अश्विनी नराजे
कोल्हापूर: राज्य शासनाच्या निवृत्ती वेतन धारक, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी 1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र प्रत्येक वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात बँकेत सादर करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने निवृत्तीवेतन धारकांनी दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी हयात असल्या बाबत निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेत यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी. तसेच यादीत आपले पॅन कार्ड, आधार कार्ड व मोबाईल क्रमांक बरोबर असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे यांनी केले आहे.
निवृत्तीवेतन धारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांनी पुनःश्च शासनामध्ये कोणत्याही प्राधिकरणात सेवा स्विकारली नाही, याबाबतची माहिती बँकेकडे सादर करावी अन्यथा माहे डिसेंबर 2024 चे निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार नाही. संबंधित बँक व्यवस्थापकांनी यादीमध्ये 10 डिसेंबर 2024 पूर्वी सर्व 100 टक्के निवृत्तीवेतन धारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांची स्वाक्षरी होईल याची दक्षता घ्यावी. दाखले 1 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2024 पर्यंत बँकेत स्वाक्षरीसाठी उपलब्ध राहतील, असेही श्रीमती नराजे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.