no images were found
डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत इलेक्ट्रॉनिक नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस सुविधा उपलब्ध
कोल्हापूर: डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मार्फत 28 ऑक्टोबर 2024 पासून Enach (Electronic National Automated Clearing House) ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या अंतर्गत, IPPB चे खाते असलेला ग्राहक आपल्या खात्यातून आवर्ती स्वरुपाचे सर्व व्यवहार करु शकतात. याद्वारे आपल्या खात्यातून कर्ज हप्ता भरणे, आवर्ती देयके भरणे, विमा हप्ता भरणे, म्युचुअल फंडचे हफ्ते भरणे इत्यादी व्यवहार NACH MANDATE द्वारे करता येतील. या सुविधेबाबत सविस्तर महिती https://www.ippbonline.com/web/ippb/e-nach या पोर्टलवर उपलब्ध असून 155299 आणि 033-22029000 या दूरध्वनी नंबरवर मिळेल. या सुविधेच्या तसेच इतर ग्राहपयोगी सेवांच्या अधिक माहितीसाठी कोल्हापूर येथील IPPB शाखा, प्रधान डाक कार्यालय, रमण मळा कोल्हापूर (0231-2656822) येथे संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर विभागाच्या प्रवर डाक अधीक्षकांनी केले आहे.