no images were found
शिवाजी विद्यापीठामध्ये डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभाग आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त शुक्रवार दि. ९/०८/२०२४ रोजी प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास ग्रंथालय माहितीशास्त्र अधिविभागाचे विभागप्रमुख डॉ. एस. बी. पाटील, ज्ञान स्त्रोत केंद्राचे प्र. संचालक डॉ. डी. बी. सुतार, सहयोगी प्राध्यापक डॉ. युवराज जाधव, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. शिवराज थोरात, अधिविभागातील सर्व संशोधक, बी.लीब.आय.एस्सी.,बी.लीब.आय.एस्सी. चे सर्व विद्यार्थी, अधिविभागातील प्रशासकीय कर्मचारी व ज्ञान स्त्रोत केंद्रातील सर्व वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.