no images were found
कृषी रसायने व किड व्यवस्थापन , शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी): कृषी रसायने व किड व्यवस्थापन, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे विद्यार्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्येश्याने, ट्रेनिंग प्लेसमेंट सेल, शिवाजी विद्यापीठ अंतर्गत, UPL लिमिटेड कंपनीचे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करणायत आले.
या इंटरव्ह्यू प्रक्रियेसाठी अधिविभागातील एकूण ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. UPL लिमिटेड कंपनीकडून हेड विकास ओल्तीकर, ग्रुप हेड प्रवीण मोरे आणि एच आर मेनेजर अजय वाधवानी आणि सुजित नाडे यांनी मुलाखती घेतल्या . अधिविभागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिविभाग प्रयत्न करत असून यातून इंडस्ट्रीला अपेक्षित असे मनुष्यबळ निर्मितीसाठी देखील प्रयत्न करत आहे, असे या प्रसंगी बोलताना प्रा. डॉ. एस. आर. यंकंची यांनी सांगितले. देशातील कृषी क्षेत्रातील होत असलेल्या प्रगतीमुळे विद्यार्थामध्ये कृषी क्षेत्रातील अभ्यासक्रमाकडे कल वाढत असल्याचे सांगितले.
या प्रसंगी कंपनीचे एच आर मेनेजर अजय वाधवानी यांनी कंपनी संदर्भात माहिती देऊन कंपनीमधील विविध संधी बद्दल माहिती दिली. या वेळी शिवाजी विद्यापीठाचे ट्रेनिंग प्लेसमेंट सेल चे अधिकारी डॉ. आर. डी. पडवळ यांनी विद्यार्थ्याना आवश्यक असणारे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. शिवाजी विद्यापीठाचे ट्रेनिंग प्लेसमेंट सेल चे अधिकारी डॉ. आर. डी. पडवळ आणि त्यांचे सहकरी व अधिविभागातील सहायक प्राध्यापक डॉ. प्रियांका मोहिरे यांनी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले. निवड झालेल्या विद्यार्थांनी कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले आणि अधिविभागातील प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.