Home मनोरंजन राजकारणातला आदर्श ‘युवानेता’ प्रदर्शित होतोय २३ ऑगस्टला

राजकारणातला आदर्श ‘युवानेता’ प्रदर्शित होतोय २३ ऑगस्टला

0 second read
0
0
44

no images were found

राजकारणातला आदर्श ‘युवानेता’ प्रदर्शित होतोय २३ ऑगस्टला

कोल्हापूर  – सध्याचे राजकारण, समाजकारण, नागरिकांची होणारी फरफट आणि त्यातून पेटून उठणारा एक ‘युवानेता’. सोशल मीडियावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘युवानेता’ चित्रपटाच्या पोस्टरने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. लक्षवेधी शीर्षकामुळे तरुणांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता दिसत आहे. चित्रपट २३ ऑगस्ट २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
महाविद्यालयातील अंकुर मित्रांसमवेत अन्यायाविरुद्ध नेहमी लढा देतो. अंकुरची वाढलेली लोकप्रियता स्थानिक आमदारास खुपू लागते. आमदार आपली शक्ती वापरून अंकुरला दाबण्याचा प्रयत्न करतो. मात्र अंकुर न दबता तेवढ्याच त्वेषाने उभारी घेतो. या सर्व गदारोळात मित्र, प्रेम आणि नाती हरवतात का? आणि त्यांची किंमत मोजावी लागते का? हे चित्रपटात प्रकर्षाने कळणार आहे.
मनाला प्रश्नांच्या घेऱ्यात अडकवणारं कथानक, गंभीर आणि खोल संवाद, दर्जेदार कलाकारांची जुगलबंदी, मंत्रमुग्ध करणारी गाणी आणि अंगावर शहारे आणणारे पार्श्वसंगीत या समीकरणामुळे ‘युवानेता’ चित्रपटाची चर्चा महाराष्ट्रात सर्वत्र होणार आहे.
प्रकाश फिल्म्स प्रस्तुत युवानेता चित्रपट योगेश रमेश जाधव यांनी दिग्दर्शित केला आहे. योगेश जाधव यांची ही सहावी राजकीय सामाजिक चित्रकृती आहे. राजू राठोड, जगदीश कुमावत यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात संजय खापरे, कमलेश सावंत, माधव अभ्यंकर, तेजा देवकर, मीरा जगन्नाथ, अंकुर क्षीरसागर, मिलिंद जाधव या स्टार अभिनेत्यांनी आपल्या भूमिका विलक्षण साकारल्या असून हरीश थोरात, हर्षदा बामणे, प्रमोद पुजारी, अमन साळवी हे उत्कृष्ट कलाकार दिसणार आहेत. कथा अंकुर क्षीरसागर, पटकथा अमित बेंद्रे, संवाद भक्ती जाधव, अंकुर क्षीरसागर, अमित बेंद्रे, छायाचित्रण मयूरेश जोशी, कार्यकारी निर्माता कुणाल निंबाळकर, निर्मिती व्यवस्थापन रवी दीक्षित, प्रसाद कुलकर्णी, कला दिग्दर्शन नितीन बोरकर, दिलीप कंढारे, संकलन विशाल कोटकर, संगीत अमोल नाईक, नीलेश पाटील, गीत राजेश सांगळे, नितीन बागडे, नीलेश पाटील, रंगभूषा सुशांत वाघमारे, वेशभूषा स्मिता धुमाळ, साऊंड रेकॉर्डीस्ट योगेश क्षीरसागर, नृत्यदिग्दर्शन रोहन केंद्रा, मानसी कोवळे, यांनी केले आहे.
“सद्यस्थितीत दूषित झालेलं राजकारण आणि प्रस्थापित नेत्यांच्या स्वार्थी प्रतिमेपलीकडे जाऊन एक आदर्श नेता कसा असावा, या विचाराने ‘युवानेता’ चित्रपटाची निर्मिती झाली आहे. तळागाळातून आलेला आणि समाजभान असलेला अंकुर प्रस्थापितांच्या छाताडावर बसून संघर्षातून सूर्य कसा निर्माण करतो, हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आशा आहे की महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना चित्रपट नक्कीच आवडेल,” असे दिग्दर्शक योगेश रमेश जाधव म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…