no images were found
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यृहातील आगीच्या घटनेची चौकशीसाठी समिती गठीत
कोल्हापूर :- कोल्हापूरचे वैभव असलेले ऐतिहासकि संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयृहास गुरुवारी रात्री 9.30 च्या सुमारास अचानक आग लागली होती. रात्री आग लागलेचे समजल्यावर तात्काळ प्रशासक के.मंजूलक्ष्मी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे व सर्व अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ही आग रात्रौ 12.30 वाजता महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्यावतीने 42 टँकरद्वारे आटोक्यात आणण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या अद्यायावत टर्नटेबल लॅडर या वाहनाने आग विझविण्यात प्रभावी काम केले त्यामुळे स्टेजकडील व समोरच्या बाजूच्या आगीवर नियंत्रण मिळविता आले. त्याचबरोबर अग्निशमन विभागाचे 6 फायर फायटर, 1 रेक्सू व्हॅन, 6 टँकर, विमानतळ प्राधिकरणाचे अत्याधुनिक वाहन, एमआयडीसी, इचलकरंजी, सांगली, वारणा, हुपरी, हातकणंगले, गडहिंग्लज व पन्हाळा या नगरपालिकांचे अग्निशमन वाहनाद्वारे आग विझविण्यात आली. याचबरोबर अग्निशमन विभागाचे 70 फायरमन व नगरपालिकेचे प्रत्येक गाडीवरील फारमनच्या सहाय्याने ही आग नियंत्रणात आणण्यात आली.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी तातडीने या आगीची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांची नियुक्ती केली आहे. खासबाग मैदानाच्या मागील बाजूस ही आग लागल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगण्यात आले आहे. त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी तातडीने या समितीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी महावितरण, ए.सी व अन्य तज्ञांची आवश्यकता भासल्यास त्यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर या आगीबाबत पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेने केशवराव भोसले नाट्यगृहाचा विमा उतरला असून साधारणत: साडेसात कोटीचे नुकसान भरपाई मिळावे म्हणून दावा केला जाणार असलेचे सांगितले. महापालिका दरवर्षी या इमारतीचे फायर ऑडिट करते. यावर्षीही फायर ऑडिट करण्यात आले आहे. शासन स्तरावर या नाटयगृहाची पुर्नरबांधणी करण्यासाठी ईस्टीमेट तयार करुन तात्काळ शासनास प्रस्ताव सादर करणार असलेचे सांगितले.
साडेतीन तासात आग आटोक्यात
गुरुवारी रात्री 9.30 च्या सुमारास आग लागल्याचे निदर्शनास येताच महापालिकेचे फायर फायटर घटना स्थळी दाखल झाले. आगीचे रौद्ररुप पाहून टर्नटेबल लॅडरसह कोल्हापूर परिसरातील नगरपालिकेंची फायर फायटर मागविण्यात आले. या फायर फायटरमध्ये पाणी आणून ओतण्यासाठी 6 टँकरच्या माध्यमातून 42 फेऱ्या करण्यात आल्या. फायर फायटरला घटनास्थळीच पाण्याचा पुरवठा सुरु ठेवल्यामुळे कमी वेळेत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
या घटनेवेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहा.आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता सतीश फप्पे, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, नाट्यगृहाचे व्यवस्थापक समीर महाब्री, स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर, जयवंत खोत, ओंकार खेडकर, तांडेल वामन चौरे, भगवान शिगाडे, फायरमन मधूकर जाधव, निवास जाधव, विजय सुतार, अभिजीत सरनाईक, उत्तम पोवार, अभय कोळी, प्रविण ब्रम्हटंडे, गिरीष गवळी, प्रमोद मोरे, सुशांत जोंधळे, संभाजी ठेपले, सुनिल यादव, चेतन जाणवेकर, संग्राम मोरे, संग्राम पाटील, अविनाश पाटील, आकाश जाधव, नितीश शिनगारे, सौरभ पाटील, श्रीधर चाचे, अनिकेत परब, सुदेश पाटील, अजित मळेकर, प्रभाकर खेबुडे, मेहबूब जमादार, योगेश कदम, स्वप्निल पाटील व कर्मचारी उपस्थित होते.