Home स्पोर्ट्स टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही : जय शाह

टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही : जय शाह

1 second read
0
0
214

no images were found

टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही : जय शाह

मुंबई : २०२३ मध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी भारत पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे. याआधी टीम इंडिया या मालिकेसाठी पाकिस्तानला जाऊ शकते, अशी अटकळ होती.  जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत तसेच ते आशियाई क्रिकेट परिषदेचेही अध्यक्ष आहेत.

आशिया चषक स्पर्धेसाठी आम्ही पाकिस्तानात जाणार नाही, आशिया चषकासाठी एखादे तटस्थ ठिकाण निवडणे ही काही मोठी गोष्ट नाही.असे शहा म्हणाले.

या वर्षीचा आशिया कप टी-२० विश्वचषकापूर्वी संपला आहे आणि यंदाचे आशिया चषकाचे जेतेपद श्रीलंकेने जिंकले. हा आशिया कप दुबईमध्ये झाला.

टीम इंडियाने पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतल्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसेल. यजमान म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला इथे खूप काही कमावता आले असते, पण आता ते त्यांच्यासाठी तोट्यासारखे असेल. कारण टीम इंडियाने माघार घेतल्यास ठिकाण बदलणे आवश्यक आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार कोल्हा…