Home Uncategorized सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळीचं गिफ्ट

सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळीचं गिफ्ट

0 second read
0
0
39

no images were found

सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळीचं गिफ्ट

मुंबई : यंदाची दिवाळी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस येणार असल्यानं कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबरच्या वेतनाबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय राज्य सरकारकडून प्रसिद्ध झाला आहे. राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी म्हणजेच २१ ऑक्टोबरपर्यंत वेतन अदा करण्याचे आदेश देणारा शासन निर्णय जारी झाला आहे.
राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना दिवाळी सण साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने ऑक्टोबर २०२२ चे माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी देण्याचा सरकारचा विचार होता. राज्य सरकारनं वेतन अदा करण्यासंदर्भातील नियम शिथील करुन ऑक्टोबर २०२२ या महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतन २१ ऑक्टोबर २०२२ रोजी अदा करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, अकृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी / कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांना देखील याचा लाभ होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय   

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय              …