Home Uncategorized राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

44 second read
0
0
26

no images were found

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

            मुंबईदि. ११ : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार आहेत. नंदुरबारगोंदियारत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा चार जिल्हयांमध्ये पुरुष  मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.

पुण्यात ८२ लाखांहून अधिक मतदार

            पुण्याची एकूण मतदार संख्या ८२ लाख ८२ हजार ३६३ आहे. तर मुंबई उपनगरची एकूण मतदार संख्या ७३ लाख ५६ हजार ५९६ इतकी आहे. ठाण्याची एकूण मतदार संख्या ६५ लाख ७९ हजार ५८८नाशिक जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या ४८ लाख ०८ हजार ४९९ इतकी आहे. तर नागपूरची एकूण मतदार संख्या ४२ लाख ७२ हजार ३६६ इतकी आहे.

रत्नागिरीनंदुरबारगोंदिया आणि सिंधुदुर्गात महिला मतदारांची संख्या अधिक

            चार जिल्ह्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक आहेत. रत्नागिरीची एकूण मतदार संख्या १३ लाख ०३ हजार ९३९ असून यामध्ये ११ तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ३१ हजार ०१२ आहे तर महिला मतदारांची संख्या ६ लाख ७२ हजार ९१६ इतकी आहे. नंदुरबारची एकूण मतदार संख्या १२ लाख ७६ हजार ९४१ असून यामध्ये १२ तृतीयपंथीची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ३७ हजार ६०९ आहे तर महिला मतदारांची संख्या ६ लाख ३९ हजार ३२० इतकी आहे. गोदिंया जिल्ह्यातही महिला मतदारांची संख्या जास्त आहे. गोंदियाची एकूण मतदार संख्या १० लाख ९२ हजार ५४६ असून यामध्ये १० तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ५ लाख ४१ हजार २७२ आहे तर महिला मतदारांची संख्या ५ लाख ५१ हजार २६४ इतकी आहे. सिंधुदुर्गची एकूण मतदार संख्या ६ लाख ६२ हजार ७४५ असून यामध्ये १ तृतीयपंथीची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ३ लाख ३० हजार ७१९ आहे तर महिला मतदारांची संख्या ३ लाख ३२ हजार ०२५ इतकी आहे.राज्यात १९ एप्रिल२६ एप्रिल७ मे१३ मे आणि २० मे अशा पाच टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे. राज्यात ८ एप्रिल २०२४ पर्यंत एकूण ९ कोटी २४ लाख ९१ हजार ८०६ मतदारांची नोंद आहे. यामध्ये ४ कोटी ८० लाख ८१ हजार ६३८ पुरुष मतदार तर ४ कोटी ४४ लाख ०४ हजार ५५१ महिला मतदार आणि ५ हजार ६१७ तृतीयपंथी मतदार आहेत.

५ जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार

            अहमदनगरसोलापूरजळगावकोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक मतदार आहेत. अहमदनगरमध्ये एकूण मतदार ३६ लाख ४७ हजार २५२ आहेत. सोलापूरमध्ये एकूण मतदार ३६ लाख ४७ हजार १४१ आहेत. जळगावमध्ये एकूण मतदार ३५ लाख २२ हजार २८९ आहेत. कोल्हापूरमध्ये एकूण मतदार ३१ लाख ७२ हजार ७९७ आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण मतदार ३० लाख ४८ हजार ४४५ आहेत. बुलढाणाअमरावतीयवतमाळनांदेडरायगडमुंबई शहरबीडसातारासांगली आणि पालघर या १० जिल्ह्यांमध्ये २० लाखांहून अधिक मतदार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

  ‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प   कोल्हापू…