
no images were found
नेहा जोशी आणि आशुतोष कुलकर्णी यांनी रामनवमी साजरीकरणापूर्वी अयोध्यामधील राम मंदिराला भेट दिली!
रामनवमी हा प्रभू श्रीरामाच्या जन्मानिमित्त साजरा केला जाणारा पवित्र उत्सव आहे. उत्तरप्रदेशमधील पवित्र शहर अयोध्याला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे, जे प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान आहे. नुकतेच अयोध्येमध्ये राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे, ज्यामुळे यंदाचे साजरीकरण भव्यअसणार आहे. राम मंदिरामधून निष्ठा, भक्ती, सांस्कृतिक वारसा आणि सर्वोत्तम वास्तुकला दिसून येते. जगप्रसिद्ध राम मंदिराची भव्यता आणि शहरातील भव्य रामनवमी साजरीकरणाची तयारी पाहण्यासाठी एण्ड टीव्हीवरील मालिका ‘अटल'मधील प्रमुख पात्र कृष्णा देवी वाजपेयी (नेहा जोशी) आणि कृष्णन बिहारी वाजपेयी (आशुतोष कुलकर्णी) यांनी पहिल्यांदाच अयोध्याला भेट दिली. या संस्मरणीय क्षणामधून त्यांना आध्यात्मिकतेचा अनुभव मिळाला, तसेच त्यांनी साजरीकरणापूर्वी राम लल्लाचा आशीर्वाद देखील घेतला.
आपला आनंद व अनुभव व्यक्त करत एण्ड टीव्हीवरील मालिका‘अटल'मधील नेहा जोशी ऊर्फ कृष्णा देवी वाजपेयी म्हणाल्या,“राम मंदिराला भेट देण्याच्या विचाराने माझ्यामध्ये कृतज्ञता व भक्तीची भावना निर्माण केली. मी प्रभू श्रीरामांची भक्त आहे, ज्यामुळे अयोध्या शहर आणि मंदिराला भेट देण्याची संधी स्वप्न पूर्ण झाल्यासारखी होती. राम लल्लाच्या दिव्य मूर्तीसमोर उभे राहत आशीर्वाद घेण्याचा अनुभव मी कधीच विसरणार नाही. मी अचंबित व भावूक झाले. राम लल्लाचा दिव्य चेहरा पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळले. राम लल्लासमोर उभे राहत आशीर्वाद घेताना मी मूर्तीकडे एकटक पाहत होते, जो अत्यंत संस्मरणीय अनुभव होता. माझे मन शांत होण्यासह मी भक्तीमध्ये तल्लीन झाले होते. मी आमची मालिका सतत यशस्वी होत राहण्यासाठी, तसेच माझ्या प्रियजनांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली. आम्ही तेथून निरोप घेत असताना संपूर्ण वातावरण ‘जय श्री राम च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते आणि रामनवमीसाठी उत्साहपूर्ण तयारीला सुरूवात झाली होती.
काही रामभक्त आमच्याकडे आले आणि त्यांनी आमची मालिका व पात्रांप्रती त्यांचे प्रेम व्यक्त केले, जे अत्यंत हृदयस्पर्शी होते, तसेच आम्हाला धन्य वाटले. या आध्यात्मिक तीर्थयात्रेने माझ्या मनावर व हृदयावर अमिट छाप निर्माण केली आणि मला आध्यात्मिकतेचा अनुभव दिला. पहिल्यांदाच राम मंदिराला भेट देण्याच्या अनुभवाबाबत सांगताना आशुतोष कुलकर्णी ऊर्फ कृष्णन बिहारी वाजपेयी म्हणाले, “देशभरात, तसेच जगभरात रामनवमी उत्सव उत्साहात व भक्तीसह साजरा केला जातो. पण, विशेषत: अयोध्यामध्ये भव्य स्वरूपात सण साजरा केला जातो, जेथे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसह यंदा या सणाच्या उत्साहामध्ये अधिक भर झाली आहे. मी मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद घेतला आणि रामनवमी साजरीकरणाची भव्य तयारी पाहिली. तो अनुभव अचंबित करणारा व सर्वोत्तम होता. मंदिरामधील वास्तुकला पाहून मी भारावून गेलो आणि राम मंदिर भव्य दिसत होते. मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतर मी भक्तीमध्ये तल्लीन झालो, सर्वत्र ‘जय श्री राम चा जयघोष सुरू होता. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर श्रीरामांच्या वैश्विक सामर्थ्याचे प्रतीक असलेल्या राम लल्लाची दिव्य मूर्ती पाहून मी थक्क झालो. प्रार्थना आणि उदबत्तीच्या सुगंधाने
पवित्र वातावरणामध्ये अधिक उत्साहाची भर केली आणि मी परमात्म्याशी संलग्न झालो.‘जय श्री राम चा जप करण्याचा अनुभव उत्तम होता, जो कायमस्वरूपी माझ्या स्मरणात राहिल. ही भेट अत्यंत सुरेख व संस्मरणीय अनुभव होता. मंदिरामधून परत येत असताना मी माझे कुटुंबिय व मित्रांसाठी स्मृतिचिन्हे व प्रसाद घेतला. नेहा जोशी यांना कृष्णा देवी वाजपेयीच्या भूमिकेत आणि आशुतोष कुलकर्णी यांना कृष्णन बिहारी वाजपेयीच्या भूमिकेत पाहण्यासाठी पाहत राहा मालिका ‘अटल' दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!