
no images were found
सांगत आहेत झी टीव्हीवरील कलाकार ‘सिबलिंग्स डे’ निमित्त आपल्या भावाबहिणींसोबत असलेल्या दृढ नात्याबद्दल
भावंडांसोबत असलेले नाते हे प्रेम, भांडणे, स्पर्धा आणि आयुष्यभरासाठी दोस्तीचे असते. जगातील सर्व नात्यांमध्ये तुमचे भावंड हेच तुमच्यासोबत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत असतात. त्यांच्यासोबत असताना तुम्हांला कुठलेही ढोंग करण्याची गरज नसते. ह्या खास दिवस साजरा करण्यासाठी झी टीव्हीवरील कलाकार ‘कुमकुम भाग्य’मधील राची शर्मा, ‘भाग्यलक्ष्मी’मधील ऐश्वर्या खरे, ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’मधील मनित जौरा, ‘प्यार का पहला अध्याय शिवशक्ती’मधील अर्जुन बिजलानी, ‘इक कुडी पंजाब दी’मधील मोनिका खन्ना आणि हे त्यांच्या आयुष्यात त्यांना भाऊ किंवा बहिण असल्याबद्दल ते किती आभारी आहेत याबद्दल सांगत आहेत.
‘कुमकुम भाग्य’मध्ये पूर्वीच्या भूमिकेतील राची शर्मा म्हणाली, “मला वाटतं की तुमचे भाऊबहिणच तुमचे आयुष्यभराचे दोस्त असतात. माझा धाकटा भाऊ आर्यन हा तर माझी जीवनरेखा आहे. तो अतिशय मस्तीखोर आहे आणि मला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही. इंदौरमधल्या लहानपणीच्या आमच्या अनेक गोड आठवणी आहेत. आता कामानिमित्त मी मुंबईला स्थायिक झाले आहे, आणि मला त्याची खूप आठवण येते. मी त्याला नक्कीच व्हिडीओ कॉल करेन आणि त्या दिवशी त्याच्यासाठी काहीतरी गोड पदार्थ नक्की पाठवेन.”
झी टीव्हीवरील ‘भाग्यलक्ष्मी’मध्ये लक्ष्मीच्या भूमिकेतील ऐश्वर्या खरे म्हणाली, “मला दोन धाकट्या बहिणी आहेत समृद्धी आणि प्रतिष्ठा, ज्या माझ्या फक्त बहिणीच नाहीत तर माझी बाळेच आहेत. मी त्यांची मोठी बहिण असल्यामुळे त्यांच्या आयुष्यात मी अनेक भूमिका निभावल्या आहेत आणि त्यासाठी मी परमेश्वराची आभारी आहे. मला समृद्धीची फार आठवण येते कारण आता ती कॅनडाला राहायला गेली आहे. आम्ही तिघी एकत्र येण्याची आणि मस्त जुन्या दिवसांची आठवण काढण्याची मी प्रतीक्षा करत आहे.”
झी टीव्हीवरील ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’मध्ये युगच्या भूमिकेतील मनित जौराम्हणाला, “माझे भाऊबहिण माझी सगळ्यात मजबूत सपोर्ट सिस्टम आहेत. लहान भावाबहिणीचा मोठा भाऊ बनणे मजेदार आहे पण त्याचमुळे मी एक जबाबदार व्यक्तीही बनलो आहे. त्यांना काहीही समस्या असेल तर त्यांनी माझ्याकडे यावे असे बनण्याचा मी खूप प्रयत्न केला आहे. मी मोठा असलो तरी माझ्यासाठी ते नेहमीच असतात. ते माझे खासगी सुपरहीरोज आहेत. माझी बहिण तर माझी दुसरी आईच आहे. माझा दिवस चांगला व्हावा यासाठी काय बोलायला हवं हे तिला बरोबर कळतं. ती माझी काळजी घेते.आज आमच्या मस्तीने भरलेल्या साहसांसाठी, अथक हसण्यासाठी आणि आम्हांला बांधून ठेवणाऱ्या दृढ प्रेमाची आठवण काढूया. ते माझ्यासोबत असल्यामुळे आयुष्याचा हा प्रवास आनंददायी बनला आहे.”
झी टीव्हीवरील ‘प्यार का पहला अध्याय शिवशक्ती’मधील शिवच्या भूमिकेतील अर्जुन बिजलानी म्हणाला, “भावंड हा शब्द ऐकला की मला लहानपणीच्या माझ्या भावासोबतच्या, निरंजनसोबतच्या दिवसांची आठवण येते. माझा भाऊ आणि माझा मुलगा अयान यांचे मस्त जमते आणि तो तर प्रत्येक पार्टीची जान असतो. आम्ही दोघेही आपापल्या आयुष्यात व्यस्त आहोत पण तरीही आम्ही दोघे एकमेकांसाठी वेळ काढतो. माझा भाऊ माझ्यासाठी आधारस्तंभ आहे आणि आम्ही दोघेही एकमेकांसाठी आहोत.”
झी टीव्हीवरील ‘इक कुडी पंजाब दी’मध्ये तेजीच्या भूमिकेतील मोनिका खन्ना म्हणाली, “मला एक मोठी बहिण आहे रतिका, जी माझ्यासाठी माझ्या आईसारखीच आहे. ती माझी सगळ्यात मोठी समीक्षक आहे आणि सगळ्यात मोठी चीअरलीडरसुद्धा. मला आठवतंय 2005 मध्ये मी जर्मनीला, माझ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ट्रिपवर जात असताना मला कळत नव्हतं की मी किती पैसे नेऊ, तेव्हा माझ्या बहिणीने विमानतळावर येऊन अगदी निस्वार्थीपणे तिचा अख्ख्या महिन्याचा पगार माझ्या हातात दिला. त्यावेळी मला त्या गोष्टीचे महत्त्व लक्षात आले नव्हते पण आता मला कळतंय की ती माझी बहिण असणे हे माझे किती मोठे भाग्य आहे. ती अतिशय निस्वार्थी आहे आणि माझे तिच्यावर मनापासून प्रेम आहे. ती माझे जग आहे.”