no images were found
ओरा फाइन ज्वेलरीच्या नवीन कलेक्शनसह आकर्षक दिसा!
गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा शुभारंभ. पारंपारिकरित्या हा सण नवीन खरेदी करत साजरा केला जातो, जे समृद्धता व सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी मागणी वाढत असताना ओरा हा भारतातील प्रमुख डायमंड ज्वेलरी ब्रँड पसंतीचा आहे आणि सतत प्रत्येक प्रसंगासाठी डिझाइन करण्यात येणारे नवीन कलेक्शन्स लॉंच करत आहे.
नवीन गुढीपाडवा कलेक्शन सादर करत ओरा फाइन ज्वेलरीने विविध पसंतींची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या आकर्षक श्रेणीचे अनावरण केले आहे. या कलेक्शनमधील सर्वात लक्षवेधक पीस म्हणजे आकर्षक् मंगळसूत्र बॉक्स सेट, जो पारंपारिक पैठणी किंवा नऊवारी साड्यांच्या मोहकतेशी जुळून जाण्याकरिता काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे आणि उत्सवी पेहरावामध्ये अधिक आकर्षकतेची भर करतो. या विशेष बॉक्स सेटमध्ये आकर्षक मंगळसूत्राला शोभून दिसणारे कानातले, अतिरिक्त अंगठी आणि ब्रेसलेटचा समावेश आहे, जे तुमच्या उत्सवी लुकला अधिक आकर्षक करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. गुढीपाडव्याला अधिक आनंदमय व संस्मरणीय करण्यासाठी ओराने हा विशेष बॉक्स सेट १७४,९९९ रूपयांमध्ये लॉंच केला आहे आणि तुम्ही १,७४,९९९ रूपये ९ ईएमआय पर्यायांसह भरू शकता. या ऑफरचा ग्राहकांना किफायतशीर व सोईस्कररित्या उच्च दर्जाचे दागिने खरेदी करण्यास सक्षम करण्याचा मनसुबा आहे.
याव्यतिरिक्त, ‘एकता’ – द वेडिंग कलेक्शन आमच्या विद्यमान कलेक्शन्समधील नवीन भर आहे, ज्यामध्ये अस्त्र, डिझाइर्ड व प्लॅटिनम कलेक्शन्सचा समावेश आहे. प्रत्येक कलेक्शनमध्ये अद्वितीय व लक्षवेधक डिझाइन आहेत, ज्यामधून आमच्या ब्रँडची सर्वोत्तमता व दर्जाप्रती कटिबद्धता दिसून येते. ओरा त्यांच्या सुरू असलेल्या अॅनिव्हर्सरी सेलसोबत रंगीत खड्यांसह सजवण्यात आलेल्या चमकदार डायमंड नेकलेसपासून बारकाईने तयार करण्यात आलेल्या बॉक्स सेट्सपर्यंत ऑफरिंग्जच्या वैविध्यपूर्ण श्रेणीसाठी पसंतीचे गंतव्य आहे.
ओराची कारागिरी व आकर्षकतेप्रती कटिबद्धता त्यांच्या कलेक्शन्सच्या माध्यमातून सुरेखरित्या दाखवण्यात आली आहे, ज्यामधून प्रत्येक दागिना प्रेम व साजरीकरणाची अद्वितीय गाथा सांगण्याची खात्री मिळते. ओरा १०० टक्के प्रमाणित दागिन्यांसह कॉम्प्लीमेण्टरी विमा* व मोफत आजीवन देखभाल सेवा प्रदान करण्यासाठी प्रसिद्ध आहे. ब्रँड हिऱ्यांसाठी आजीवन एक्स्चेंज, बायबॅक व सेव्हन-डे रिटर्न पॉलिसी देतो. तसेच ओरा ६ महिन्यांची अपग्रेड सुविधा देतो आणि ब्रँडचे सर्व दागिने बीआयएस हॉलमार्क प्रमाणित आहेत. लॉंच साजरीकरणाचा भाग म्हणून ओरा नवीन स्टोअरला भेट देणाऱ्या ग्राहकांना विशेष उद्घाटनीय सूट, स्पेशल ऑफर्स आणि विशेष ब्रायडल लाऊंज देणार आहे.