विद्यापीठातर्फे विशेष स्वराज्य रॅलीसह सामूहिक राष्ट्रगीत गायन कोल्हापूर : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि स्वराज्य महोत्सव या निमित्ताने आज शिवाजी विद्यापीठात विशेष स्वराज्य रॅलीसह सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला. विद्यार्थी-विद्यार्थिनींसह सर्वच घटकांचा या उपक्रमात सहभाग राहिला. आजादी का अमृतमहोत्सव, शिवाजी विद्यापीठाचा हीरक महोत्सव आणि स्वराज्य महोत्सव अशा संयुक्त निमित्ताने विद्यापीठातर्फे अनेकविध उपक्रमांचे गेल्या पंधरवड्यात आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना सर्वच …