Home सामाजिक मारकोपोलो  कार्यक्रमाचे  आयोजन

मारकोपोलो  कार्यक्रमाचे  आयोजन

48 second read
0
0
194

no images were found

मारकोपोलो  कार्यक्रमाचे  आयोजन

कोल्हापूर : पर्यटन जगातील सर्वात मोठा व वेगाने वाढणारा उद्योग  आहे. पर्यटन हा सगळ्यांचाच आवडीचा विषय आहे. पूर्ण वर्ष भर वेगवेगळ्या ठिकाणी हवामानाच्या अंदाजानुसार पर्यटनाचा आनंद पर्यटक घेत असतात. देशातील पर्यटना  बरोबरच विदेशातील पर्यटनासाठी भारतीय लोकांची नेहमीच  पसंती राहिली आहे .हाच धागा पकडून पर्यटकांचा आनंद  द्विगणित करण्यासाठी फ्लॅमिंगो ट्रान्सवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व अरिहंत हाँलीडेज् कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देश व  विदेशातील  पर्यटनाचे उत्तमरित्या नियोजन करण्यासाठी  कोल्हापूर येथे  येत आहे. त्यासाठी  फ्लॅमिंगो ट्रान्सवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व अरिहंत हाँलीडेज् यांनी मारकोपोलो हा कार्यक्रम हॉटेल वूड लँड येथेआयोजित केला होता. श्री ललितभाई  गांधी, राजेंद्र शहा, रोनित शहा, समीर उपाध्ये या मान्यवरांनी  द्विप्रज्वलन  करून या  कार्यक्रमास सुरुवात केली. देशातील व विदेशातील पर्यटनाचे  योग्य  नियोजन,टूर्स व ट्रॅव्हलसाठी लागणाऱ्या सर्व सेवा सुविधा आता एकाच छताखाली कोल्हापूरकरांसाठी फ्लॅमिंगो ट्रान्सवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व अरिहंत हाँलीडेज्  घेऊन येत आहेत. . 

भारतामध्ये  पर्यटन हे देशातील अर्थव्यवस्थेसाठी  खूप महत्त्वाचे आहे आणि ते वेगाने वाढत देखील आहे.अरिहंत हॉलिडेज  २०१६ पासून कोल्हापूर मध्ये  कार्यरत आहेत.  जैन तीर्थ यात्रा हे त्यांचे खास वैशिट्य आहे. अरिहंत हॉलिडेज  कडून पर्यटनासाठी लागणाऱ्या सर्व सेवा व सुविधा पुरविल्या जातात त्यांचे वेगळेपण  म्हणजे प्रत्येक टूर्स बरोबर त्यांचा स्वतःचा कॅटरर्स  असतो. त्यामुळे पर्यटकांची खाण्याची गैरसोय होत नाही. 

फ्लॅमिंगो ट्रान्सवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हि १९९६ पासून पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहे. हि कंपनी लेजर ट्रॅव्हल्स असून रजिस्टर कंपनी असून. ५० पेक्षा जास्त ऑफेसेस  भारतामध्ये आहेत. ५ लोकांपासून सुरु झालेली कंपनीमध्ये आता जवळ जवळ २०० लोक काम करतात.  गुजरात,महाराष्ट्र,राजस्थान व मध्य प्रदेश मध्ये यांचे ऑफिसेस  असून फ्रॅन्चायजी  सुद्धा आहेत. देशातील व विदेशातील पर्यटनाचे नियोजन त्यांच्या मार्फत केले जाते. टूर्स आणि ट्रॅव्हल्स साठी लागणाऱ्या सर्व  सेवा त्यांचा मार्फत पर्यटकांना पुरविल्या जातात. दरवर्षी देशातील व विदेशातील ३५००० पर्यटक त्यांच्या सेवेचा लाभ घेतात. पॅकेज मध्ये एअर तिकीट, राहणे व खाणे सामाविष्ट असते. अशी माहिती फ्लॅमिंगो  ट्रान्सवर्ल्डचे श्री समीर उपाध्ये यांनी दिली तसेच भारतातील पर्यटन,भारतातही वेगवेगळी ठिकाणे त्यांची खास वैशिष्ठे व त्या ठिकाणी जाऊन काय पाहत येईल कोठे राहता येईल याची इतंभूत माहिती नुपूर त्रिवेदी यांनी दिली . 

 एक पाऊल पुढे टाकत अरिहंत हॉलिडेज देशातील पर्यटनाबरोबर विदेशातील पर्यटनासाठी फ्लॅमिंगो ट्रान्सवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बरोबर कोल्हापुरात येत आहे. त्याच्या लॉन्चिंगसाठी  फ्लॅमिंगो ट्रान्सवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व अरिहंत हाँलीडेज् यांनी  मारकोपोलो हा कार्यक्रम हॉटेल वूड लँड येथे आयोजित केला होता. देशातील व विदेशातील पर्यटनाचे नियोजन कसे करता येईल याचे तज्ञ व्यक्तीकडून  मार्गदर्शन, ऑडिओ व्हिजुअल प्रात्यक्षिक, ट्रॅव्हल सल्लागार कडून योग्य माहिती उपस्थितांना देण्यात आली. 

यावेळी श्री ललितभाई गांधी , अरिहंत हॉलिडेजचे श्री. राजेंद्र शहा, श्री. रोनित शहा  फ्लॅमिंगो ट्रान्सवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चे श्री समीर उपाध्ये, नुपूर त्रिवेदी, सूरज शहा, शलक शहा आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…