Home शासकीय बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारासाठी  31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारासाठी  31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

32 second read
0
0
37

no images were found

बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारासाठी  31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

        कोल्हापूर : बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार 2023 या पुरस्कारासाठी  www.awards.gov.in या संकेतस्थळावर दि. 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती शिल्पा पाटील यांनी कळविले आहे.

            ज्या मुलांनी (वय-5 पेक्षा अधिक व 18 वर्षा पर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपुर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना बाल शक्ती पुरस्कार दिला जातो.

            मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस वैयक्तिक पुरस्कार दिला जातो.

            संस्था स्तरावर बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला संस्था स्तरावर हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बाल कल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.

Load More Related Articles

Check Also

नवउद्योजकांना दुबईत उत्पादने निर्यातीसाठी मार्गदर्शन करणार : धनंजय दातार

नवउद्योजकांना दुबईत उत्पादने निर्यातीसाठी मार्गदर्शन करणार : धनंजय दातार    &nbs…