Home सामाजिक  गडहिंग्लज  येथे १० सहस्रपेक्षा अधिक हिंदूंचा हिंदु जनसंघर्ष मोर्चाद्वारे अविष्कार !

 गडहिंग्लज  येथे १० सहस्रपेक्षा अधिक हिंदूंचा हिंदु जनसंघर्ष मोर्चाद्वारे अविष्कार !

3 second read
0
0
474

no images were found

 

 गडहिंग्लज  येथे १० सहस्रपेक्षा अधिक हिंदूंचा हिंदु जनसंघर्ष मोर्चाद्वारे अविष्कार !

गडहिंग्लज  – हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने गडहिंग्लज शहरात १८ जानेवारीला ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ काढण्यात आला. लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्याविरोधात कठोर कायदा व्हावा, अशी मागणी करत १० सहस्रपेक्षा अधिक हिंदूंनी या मोर्चात सहभागी होऊन हिंदू शक्तीचा अविष्कार दाखवला. शहरातील म.दु. श्रेष्ठी विद्यालय येथून प्रारंभ झालेल्या या मोर्च्याची सांगता श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात झाली. गडहिंग्लज येथे हिंदुत्वाच्या सूत्रावर निघालेल्या या मोर्चास हिंदूंनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

सभेच्या समारोप्रसंगी भाजप गडहिंग्लज तालुका विस्तारक श्री. संदीप नाथबुवा, आजरा येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. नाथा देसाई, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राहुल शिंदे, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी केले. मोर्च्याच्या प्रारंभी श्री. राजू मोरे यांच्या हस्ते धर्मध्वजपूजन करण्यात आले. पुरोहित आदित्य जोशी-कापशीकर यांनी पौरोहित्य केले

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…