Home Uncategorized ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’बाबत विद्यापीठात एकदिवसीय कार्यशाळा

‘कृत्रिम बुद्धिमत्ते’बाबत विद्यापीठात एकदिवसीय कार्यशाळा

0 second read
0
0
7

no images were found

‘कृत्रिम बुद्धिमत्ते’बाबत विद्यापीठात एकदिवसीय कार्यशाळा

कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, कौशल्य विकास विभाग आणि इझी लर्निंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणशास्त्र सभागृहात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आज उत्साहात झाली.

कार्यशाळेत सध्याच्या डिजिटल युगात आणि शिक्षण क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे महत्त्व, त्याची विविध अंगे व दैनंदिन जीवनातील व्यावहारिक उपयोग याविषयी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा, याची इझी लर्निंग इन्स्टिट्यूटचे नीलेश जैन यांनी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ. केदार मारूलकर, कौशल्य विकास अधिकारी ईश्वर पुजारी उपस्थित होते.

यशोधन बोकील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. रवींद्र खैरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेला विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी कोल्हापूर,: पारंपरिक व देशी खेळांना जागति…