Home Uncategorized गरोदर मातांसाठी पंचगंगा रुग्णालयात मोफत प्रसूतिपूर्व योग सत्र दर बुधवारी योग थेरपी, व्यायाम व ध्यान सत्रांचे आयोजन

गरोदर मातांसाठी पंचगंगा रुग्णालयात मोफत प्रसूतिपूर्व योग सत्र दर बुधवारी योग थेरपी, व्यायाम व ध्यान सत्रांचे आयोजन

34 second read
0
0
6

no images were found

गरोदर मातांसाठी पंचगंगा रुग्णालयात मोफत प्रसूतिपूर्व योग सत्र दर बुधवारी योग थेरपी, व्यायाम व ध्यान सत्रांचे आयोजन

कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा रुग्णालयामध्ये गरोदर मातांसाठी (ANC Patients) मोफत प्रसूतिपूर्व योग (Prenatal Yoga) सत्राचे आयोजन करण्यात आले. उपआयुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्या उपस्थितीत आज सकाळी ११ वाजता हे सत्र घेण्यात आले. यावेळी उपआयुक्त नागेंद्र मुतकेकर यांनी दैनंदिन जीवनात योग व ध्यानाचे महत्त्व विशद केले. गरोदर मातांनी योग थेरपीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. योगासने करताना कोणतीही अडचण अथवा त्रास जाणवल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

            योगा विशेषतज्ञ डॉ. श्रेयस चव्हाण (MBBS, C.C.I.M. – NIMHANS, M.D. Clinical Yoga – S-VYASA) यांनी योग थेरपी, ध्यान तसेच गरोदरपणात योग व ध्यानाचे होणारे फायदे याबाबत उपस्थित गरोदर मातांना मार्गदर्शन केले. प्रसूतिपूर्व योगामुळे गरोदर मातांचे मानसिक संतुलन राखण्यास तसेच शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होते. तसेच प्रसूतीसाठी शरीराची तयारी होण्यास आणि सामान्य प्रसूतीसाठी (Normal Delivery) आवश्यक शारीरिक व मानसिक तयारी करण्यास योगाचा उपयोग होतो.

            आजपासून दर बुधवारी पंचगंगा रुग्णालयामध्ये गरोदर मातांसाठी मोफत योग थेरपी, व्यायाम व ध्यान सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरातील सर्व गरोदर मातांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन पंचगंगा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

            या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासन वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या काळे-हेरवाडे यांनी केले. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.१० चे कर्मचारी, आशा सेविका तसेच पंचगंगा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी कोल्हापूर,: पारंपरिक व देशी खेळांना जागति…