no images were found
गंगा विलास क्रूज बिहारमध्ये कमी पाणी पातळीमुळे अडकलं
पटना : देशातील सर्वात मोठं गंगा विलास क्रूज बिहारमधील छपरामध्ये अडकल्याचे वृत्त समोर आले आहे. वाराणसीहून आसामधील डिब्रुगडला निघालेल्या या जहाजावर स्वित्झर्लंडचे 31 पर्यटक आहेत.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या क्रूजला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर हे क्रूज वाराणसहीहून आसामधील दिब्रुगडला निघाले होते.क्रूज बिहारमील छपरा येथे दाखल झाल्यानंतर येथील गंगा नदीतील कमी पाणी पातळीमुळे अडकले.दरम्यान, क्रूझ अडकल्याचे समजताच एसडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले असून, नदीची पाणी पातळी कमी असल्याने क्रूझला किनाऱ्यावर आणणे कठीण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी दाखल एसडीआरएफच्या टीमकडून छोट्या बोटींच्या सहाय्याने क्रूजमधील पर्यटकांना बाहेर काढले जात आहे. अडकलेल्या क्रूजमधील प्रवाशांना छोट्या बोटींच्या सहाय्याने चिंदर येथे नेण्यात येत आहे.
चिंदर येथे सर्व पर्यटकांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. गंगेतील पाणीपातळी कमी असल्याने क्रूझ किनाऱ्यावर आणण्यात अडचण येत असल्याचे ते म्हणाले. गंगा विलास क्रूझचा वेग अपस्ट्रीम प्रति तास १२किलोमीटर आणि डाउनस्ट्रीम २० किलोमीटर इतका आहे. क्रूझमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आरओ सिस्टीम आहे, तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे. याशिवाय क्रुझमध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी आणि आवश्यक गरजांसाठी सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.