no images were found
पिटबुलच्या हल्ल्यात चिमुरडा जखमी झाल्याने कुटुंबानं कुत्र्याला निर्घृणपणे संपवलं
करनाल: हरयाणाच्या करनाल जिल्ह्यातील मुनक गावात एका १२ वर्षीय मुलाला पिटबुलने मुलाचा चावा घेऊन घरापासून दूरवर त्याला खेचत नेले. पिटबुल या कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. आसापासच्या लोकांनी त्याची कशीबशी सुटका केली. मुलगा रक्तबंबाळ झाल्याचं पाहून कुटुंबीय, ग्रामस्थ संतापले. त्यांनी केलेल्या जबर मारहाणीत कुत्र्याचा मृत्यू झाला.
पीडित मुलाचे आजोबा मेहर सिंह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाचवीत शिकणारा ओसांत घराबाहेर उभा होता. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या फुलसिंह यांच्या पिटबुल कुत्र्यानं ओसांतवर हल्ला केला. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याची सुटका करण्यात यश आलं, अशी तक्रार मेहर सिंह यांनी पोलिसांकडे केली आहे. ओसांत याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ओसांत घराबाहेर उभा राहून पिटबुलला पळवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी पिटबुलनं त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला घरौंडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर शवविच्छेदन करून कुत्र्याचा मृतदेह मालकाकडे सोपवण्यात आला.
पिटबुलचा मालक असलेल्या फुलसिंह यांनी ओसांतच्या कुटुंबीयांविरोधात आणि अन्य ग्रामस्थांविरोधात पशू क्रूरता कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुलसिंह यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ओसांतचे वडील अनिल कुमार, त्यांचे चुलत बंधू नितीन, अरुण, शीशपाल, दीपू आणि चार ग्रामस्थांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.