no images were found
दिव्यांग मुलांच्या प्रमाणपत्रासाठी 26 डिसेंबर रोजी शिबीराचे आयोजन
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या संकल्पनेतून कायद्यानुसार दिव्यांग मुलांच्या प्रवर्गानुसार प्रमाणपत्र काढण्यासाठी मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर आणि सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे तालुकानिहाय नियोजन करण्यात आले आहे. जास्तीत-जास्त दिव्यांग विद्यार्थी व पालकांनी शिबीरास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत वय वर्षे 0 ते 18 वयोगटातील दिव्यांग मुलांचे सर्वेक्षण गटस्तरावर कार्यरत असणारे विशेष शिक्षक व विषयतज्ञ यांच्या मार्फत केले जाते. सर्वेक्षण झाल्यानंतर कायद्या नुसार दिव्यांग मुलांच्या प्रवर्गानुसार वर्गीकरण केले जाते. समावेशित शिक्षण अंतर्गत दिव्यांग विद्यार्थी शाळेत समायोजन होण्याच्या दृष्टिने विविध सेवा सुविधा शासनामार्फत पुरविल्या जातात. यामध्ये मदतनीस भत्ता, प्रवासभत्ता, वाचक भत्ता व मुलींना प्रोत्साहन भत्ता इत्यादी सेवा पुरविण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
तालुका निहाय एकूण गटनिहाय संख्या खालीलप्रमाणे-
आजरा – दिव्यांग विद्यार्थी 394, प्रमाणपत्र नसलेले -280, भुदरगड – दिव्यांग विद्यार्थी 489, प्रमाणपत्र नसलेले 302, चंदगड – दिव्यांग विद्यार्थी -282, प्रमाणपत्र नसलेले- 137, गडहिंग्लज – दिव्यांग विद्यार्थी -494, प्रमाणपत्र नसलेले- 152, गगनबावडा – दिव्यांग विद्यार्थी- 70, प्रमाणपत्र नसलेले -34, हातकणंगले – दिव्यांग विद्यार्थी -1003, प्रमाणपत्र नसलेले- 226, कागल – दिव्यांग विद्यार्थी- 696, प्रमाणपत्र नसलेले -456, करवीर – दिव्यांग विद्यार्थी- 585, प्रमाणपत्र नसलेले- 206, पन्हाळा – दिव्यांग विद्यार्थी -545, प्रमाणपत्र नसलेले -213, राधानगरी – दिव्यांग विद्यार्थी- 411, प्रमाणपत्र नसलेले -190, शाहुवाडी – दिव्यांग विद्यार्थी 351, प्रमाणपत्र नसलेले 150 व शिरोळ – दिव्यांग विद्यार्थी -418, प्रमाणपत्र नसलेले- 116 असे एकूण 5 हजार 738 दिव्यांग विद्यार्थी असून 2 हजार 462 दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र काढण्यात आलेले नाहीत.
जिल्हास्तरावरुन 2 हजार 462 विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र काढणे आवश्यक असून या योजनेचा लाभ प्रमाणपत्राशिवाय मिळू शकत नसल्याने याबाबतीत जिल्हा समन्वयक, समावेशित शिक्षण, जिल्हा परिषद, कोल्हापूर, विशेष शिक्षक, विषयतज्ञ IE, समावेशित शिक्षण, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, सर्व पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मीना शेंडकर यांनी केले आहे.