Home सामाजिक मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यात ५ दिवसांत थंडी कमी होणार, देशाच्या विविध भागांमध्ये पावसाची शक्यता

मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यात ५ दिवसांत थंडी कमी होणार, देशाच्या विविध भागांमध्ये पावसाची शक्यता

0 second read
0
0
206

no images were found

मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यात ५ दिवसांत थंडी कमी होणार, देशाच्या विविध भागांमध्ये पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रातल्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा जोर होता. तथापि पुढच्या पाच दिवसांमध्ये हा जोर कमी होण्याची शक्यता आहे. देशाच्या विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचे लोट कमी होणार असल्यामुळे राज्यातील थंडीचा जोर कमी होण्याची श्यक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

यंदा थंडीचा कालावधी कमी असल्याची माहिती आहे. पण तरीदेखील मुंबई, कोकण, खानदेश, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद आणि नगर या जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं. ही थंडी कमी होण्यासाठी आणखी ५ दिवसांचा कालावधी लागणारे आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतीयांसाठी देखील ही एक दिलासादायक बातमी आहे. कारण, पुढचे ५ दिवस उत्तर भारतात थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पण याच दरम्यान अनेक भागांमध्ये पाऊस पडणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २१ जानेवारीपर्यंत हवामान कोरडे असेल मात्र २२ जानेवारीनंतर हवामानात बदल झाल्याचा पाहायला मिळेल.

देशाच्या विविध भागांमध्ये २३ जानेवारी ते २५ जानेवारी या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांचाही समावेश आहे. तसेच इतकंच नाहीतर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली, उत्तराखंड या राज्यांमध्येही हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…