
no images were found
लातूर-पुणे एसटी बस अपघातात ३० जण जखमी, १४ जणांची प्रकृती गंभीर
लातूर : आज (मंगळवार) सकाळी लातुर-पुणे-वल्लभनगर ही एसटी निलंगा आगारातून बाहेर पडून पुण्याच्या दिशेने जात होती. दरम्यान बोरगावकाळे परिसरात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे एसटी रस्ता सोडून खाली गेली. रस्त्याच्या खालच्या बाजूला मोठा खड्डा होता. या खड्ड्यातील उंचवट्यावर जाऊन बसचा पुढील भाग आदळला. बसच्या पुढील काचा पूर्णपणे फुटल्या.
बस खाली कोसळताच बसचा पुढील भाग चक्काचूर होऊन अचानक बस आदळल्याने तर प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुलांसह जेष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. एसटीचा अपघात झाल्यानंतर काही प्रवाशी आतमधून बाहेर आले तर गंभीर दुखापत झालेले प्रवासी त्याच अवस्थेत शेजारी पडून होते. या सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
परिसरातील लोकांनाना अपघात झाल्याचे समजताच त्यांनी अपघातस्थळी बचावकार्याला सुरुवात करत १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेला बोलावले. त्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी मुरूड रुग्णालयात दाखल करण्यात आले.